प्रेत विल्हेवाट लावून हत्या; पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी आरोपी अटक केली
साईमत/पाचोरा/ प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील २६ वर्षीय विजय भिमा राठोड याची निर्घृण हत्या झाली असून, प्रकरणातील मुख्य आरोपी पती-पत्नी अटक केले गेले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
तपासानुसार, विजय भिमा राठोड २४ फेब्रुवारी २०२६ पासून बेपत्ता होता. १३ मार्च २०२६ रोजी तपासात समोर आले की, त्याची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. या प्रकरणात पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी संजय परशुराम जाधव आणि सोनाली संजय जाधव (दोघे रा. वरसाडे तांडा, पाचोरा) यांना अटक केली आहे.
पोलिस तपासात समोर आले की, आरोपी महिला सोनाली जाधवसोबत विजय राठोडने काही अश्लील व्हिडिओ मोबाईलवर बनवले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत करून विजय याचा घातपात केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह विल्हेवाट लावला.
विजयचा भाऊ संजय भिमा राठोड (वय २५) यांनी या घटनेची फिर्याद पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये दिली. तपासाचे काम सपोनि कल्याणी वर्मा करत आहेत, तर उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत.या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले असून, पोलीस अधिकाऱ्यांनी पुढील तपास सुरु केला आहे.
