Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon:जळगावात मोठी कारवाई ठरली स्लॉटर हाऊस परिसरातील झोपड्या हटणार
    जळगाव

    Jalgaon:जळगावात मोठी कारवाई ठरली स्लॉटर हाऊस परिसरातील झोपड्या हटणार

    saimatBy saimatMarch 10, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Major action decided in Jalgaon, huts in the slaughter house area will be removed
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    महापौर दीपमाला काळे यांचे कडक आदेश जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चार दिवसांत बुलडोझर

    साईमत/ जळगाव /प्रतिनिधी

    शहरातील शिरसोली रोड परिसरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या सुमारे १३ एकर शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय अखेर प्रशासनाने घेतला असून येत्या चार दिवसांत मोठी कारवाई होणार आहे. महापौर दीपमाला काळे यांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला पोलीस बंदोबस्तात ही मोहीम तातडीने पूर्ण करण्याचे कडक आदेश दिल्याने स्लॉटर हाऊस परिसरातील अनधिकृत झोपड्यांवर मनपाचा बुलडोझर चालण्याची तयारी सुरू झाली आहे.

    मोहाडी रस्त्यालगत गट क्रमांक ६० मधील सुमारे ५ हेक्टर ४ आर म्हणजेच जवळपास १३ एकर क्षेत्रफळाची ही जागा महानगरपालिकेच्या मालकीची आहे. ‘स्लॉटर हाऊस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी पूर्वी कत्तलखाना कार्यरत होता. काही वर्षांपूर्वी महानगरपालिकेने ही जागा अटलांटा कंपनीला वापरण्यासाठी दिली होती. मात्र कालांतराने जागा रिकामी राहिल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टीधारकांनी अनधिकृत अतिक्रमण करून आपली घरे उभारली.

    या मौल्यवान जागेवर वाढत चाललेल्या अतिक्रमणांमुळे शहराच्या विकासकामांना अडथळा निर्माण होत असल्याचे प्रशासनाचे मत आहे. भविष्यात या जागेचा नियोजनबद्ध विकास करून शहरासाठी विविध सुविधा उभारण्याचा महानगरपालिकेचा मानस असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला होता.

    महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून झोपडपट्टीधारकांना यापूर्वीच अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र संबंधितांनी स्वखुशीने अतिक्रमण काढून घेतले नसल्याने प्रशासनाने आता कठोर भूमिका घेत थेट कारवाईचा निर्णय घेतला आहे.

    महापौरांच्या आदेशानुसार पुढील चार दिवसांत पोलीस बंदोबस्तात मोठी मोहीम राबवून संपूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून येथे उभारण्यात आलेल्या झोपड्या तसेच इतर अनधिकृत बांधकामे हटवून संपूर्ण १३ एकर जागा रिकामी करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे भविष्यात या जागेचा नियोजनबद्ध विकास करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगावात आदिवासी समाजाचे ‘रस्ता रोको’ आंदोलन

    March 10, 2026

    Jalgaon : माजी सैनिकांसाठी विशेष रोजगार व समुपदेशन मेळावा

    March 10, 2026

    Chalisgaon : चाळीसगावात आरपीएफ जवानाच्या घरात धाडसी चोरी

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.