Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : महानगरपालिकेत उत्कृष्ट महिला कर्मचारी, बचत गट आणि विद्यार्थ्यांचा सत्कार
    जळगाव

    Jalgaon : महानगरपालिकेत उत्कृष्ट महिला कर्मचारी, बचत गट आणि विद्यार्थ्यांचा सत्कार

    saimatBy saimatMarch 8, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: Outstanding women employees, self-help groups and students felicitated in the Municipal Corporation
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    महिला सशक्तीकरणाचं जळगावात उत्सव महापौर काळे यांचे मार्गदर्शन

    साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी

    जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे महिला सशक्तीकरण आणि समाजकल्याणाला प्रोत्साहन देणारा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात उत्कृष्ट महिला कर्मचारी, बचत गट आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तर महिलांच्या आरोग्य आणि नेतृत्वशक्तीवर विशेष मार्गदर्शन देण्यात आले.

    महापौर दीपमाला काळे यांनी महिलांसमोर मार्गदर्शन करत सांगितले की, “महिला सक्षम झाल्या तर संपूर्ण समाज प्रगत होतो. महिलांनी स्वतःचे आरोग्य जपावे, मानसिक आणि शारीरिक सक्षम राहावे. घरापुरते मर्यादित न राहता प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा.” त्यांनी दररोज योगा, व्यायाम आणि पायी चालणे यासारख्या आरोग्यवर्धक सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले. तसेच मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देण्यासह महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे देखील त्यांनी सुचविले.

    महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, समिती सदस्य विद्या सोनवणे, रंजना वानखेडे, पूजा जगताप, डॉ. अमृता सोनवणे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड आणि धनश्री शिंदे उपस्थित होते.

    कार्यक्रमाची प्रस्तावना उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी केली. त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली आणि कार्यक्रमाचे उद्देश स्पष्ट केले. यावेळी तीन बचत गटांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कर्जाचे धनादेश देण्यात आले. तसेच महानगरपालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याशिवाय इयत्ता दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

    दुपारी महिलांच्या आरोग्याविषयी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. डॉ. ऋचा नवाल यांनी स्तन कर्करोगाविषयी तर डॉ. अंजली भिरुड यांनी गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी सविस्तर माहिती दिली आणि लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करण्याचे आवाहन केले.

    कार्यक्रमाचा शेवट विविध मनोरंजक खेळांनी केला गेला, ज्यात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आनंद लुटला. विजयी महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गायत्री पाटील यांनी मानले. स्थायी समिती सदस्य वंदना इंगळे, नगरसेवक पियुष कोल्हे, उज्वला बाविस्कर, जयश्री पाटील, अंकिता पाटील, वैशाली पाटील, कविता शिवदे, प्रतीक्षा सोनवणे, माधुरी बारी, संगीता दांडेकर, कविता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

    या उपक्रमातून जळगावात महिला सशक्तीकरणाचा संदेश घराघरात पोहोचवण्याचे प्रयत्न करण्यात आले असून, समाजाच्या सर्व स्तरांमध्ये महिलांचा सहभाग वाढीस लागेल, असा विश्वास कार्यक्रम आयोजकांनी व्यक्त केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगावात गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा

    March 9, 2026

    Pachora-Bhadgaon : पाचोरा-भडगाव तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी

    March 9, 2026

    Jalgaon : महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले तातडीने कारवाईसाठी निवेदन

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.