Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»Jalgaon : महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे मंत्री रक्षाताई खडसे
    क्रीडा

    Jalgaon : महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे मंत्री रक्षाताई खडसे

    saimatBy saimatMarch 8, 2026Updated:March 8, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: Women should come forward in the field of sports, says Rakshatai Khadse
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगावात महिला क्रीडाविषयी जागरूकता वाढीसाठी कार्यक्रम

    साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी

    जागतिक महिला दिनानिमित्त महिलांमध्ये क्रीडाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच शहरी व ग्रामीण भागातील महिला खेळाडूंना अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, असे उद्देश ठेवून आयोजित केलेल्या अस्मिता लीग’ चे उद्घाटन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. यावेळी त्यांनी महिलांना क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले.

    विभागीय क्रीडा संकुल मैदानावर आयोजित या कार्यक्रमात महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन प्रसंगी मंत्री खडसे यांनी सायकल स्पर्धा व वॉकेथॉन स्पर्धेला झेंडा दाखवून शुभारंभ केला. कार्यक्रमास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या संचालिका डॉ. मोनिका घुगे, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, फिट इंडिया ॲम्बेसेडर व बॉडीबिल्डर विक्रम जाधव यासह क्रीडा विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने महिला खेळाडू उपस्थित होते.

    उद्घाटनानंतर मार्गदर्शन करताना मंत्री खडसे म्हणाल्या की, देशाला 2036 पर्यंत विकसित भारत बनविण्याचे उद्दिष्ट असून, तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच नागरिकांचे शारीरिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. युवा पिढीने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. विविध खेळांमधून युवक-युवती तं

    अनेक क्रीडा प्रकारांमध्ये उज्ज्वल भविष्य आहे आणि पालकांनी मुलांना खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये ‘अस्मिता लीग’चे आयोजन केले जात आहे. यामुळे महिलांना खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापन अशा विविध क्रीडा क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध होतील. ग्रामीण भागातील खेळाडूंना अधिक संधी मिळाव्यात यासाठी शासन विविध सुविधा उपलब्ध करून देत आहे.

    कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलेल्या मुलींना मंत्री खडसे यांच्या हस्ते सत्कारण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा क्षेत्रात विविध सेवा व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे सांगितले. तसेच स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या संचालिका डॉ. मोनिका घुगे यांनी महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे, यासाठी संस्था मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असल्याचे नमूद केले.

    कार्यक्रमाला महिला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, क्रीडा क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग सकारात्मक बदलाचे द्योतक असल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगावात गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा

    March 9, 2026

    Pachora-Bhadgaon : पाचोरा-भडगाव तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी

    March 9, 2026

    Jalgaon : महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले तातडीने कारवाईसाठी निवेदन

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.