Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्याला एमआयडीसी पोलीसांनी केले जेरबंद
    जळगाव

    दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्याला एमआयडीसी पोलीसांनी केले जेरबंद

    saimat teamBy saimat teamOctober 31, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । २५ हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास करणाऱ्या संशयित चोरट्याला अटक करण्यात आलेली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहरातील वासुदेव जोशी कॉलनीतून २६ ऑक्टोबर रोजी २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याला एमआयडीसी पोलीसांनी शहरातील अजिंठा चौफुलीवरून अटक केली आहे. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश शिवाजी सुरळकर (वय-२०) रा. इंदीरागांधी चौक धामणगाव जि. बुलढाणा असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील वासुदेव जोशी कॉलनीत राहणारे अनिल सुधाकर जाधव (वय-५२) हे कुटुंबियांसह राहतात. बांधकामाचे काम करून उदरनिर्वाह करतात. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जोशी कॉलनीत घराच्या बाधकांमासाठी दुचाकी (एमएच १९ सीसी २०७७) ने गेले.

    त्यावेळी त्यांनी पाण्याच्या टाकीजवळ दुचाकी लावून बांधकामच्या ठिकाणी निघून गेले. दुपारी ४ वाजेच्या सुमारास चोरट्याने २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा शोध घेत असतांना शहरातील अजिंठा चौकात अंकुश शिवाजी सुरळकर (वय-२०) रा. इंदीरागांधी चौक धामणगाव जि. बुलढाणा हा संशयास्पद हालचाल करत असल्याची गोपनिय माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यांच्या पथकातील सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, मिलींद सोनवणे व योगेश बारी आदींनी कारवाईसाठी त्याला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता संशयिताने वासूदेव जोशी कॉलनीतून दुचाकी चोरी केल्याचे कबुल केले आहे.

    याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज न्यायालयात हजर केले असता त्याला ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : प्रभाग ५ आरोग्य कार्यालयात महापौरांचा धडाका कर्मचाऱ्यांना शिस्तीचा इशारा

    February 16, 2026

    Chopda-Virwade : चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी

    February 16, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.