Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Jalgaon: दोन वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा अवघ्या १२ तासांत जेरबंद
    क्राईम

    Jalgaon: दोन वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा अवघ्या १२ तासांत जेरबंद

    saimatBy saimatFebruary 21, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: Inn thief who broke into two wine shops arrested in just 12 hours
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

    साईमत/जळगाव /प्रतिनिधी

    शहरात एकाच रात्री दोन वाईन शॉपचे शटर तोडून लाखो रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत जेरबंद करत कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

    दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील भजे गल्ली येथील ‘प्रिन्स वाईन शॉप’चे शटर तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील सुमारे २ लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती. त्याच रात्री एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अजिंठा चौफुली परिसरातील ‘राज वाईन्स’चे शटर तोडून सुमारे १ लाख २५ हजार रुपये लंपास करण्यात आले. या दोन्ही घटनांमुळे शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी जिल्हापेठ व एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

    घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करत तसेच तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढण्यात आला. अखेर अवघ्या १२ तासांत रामनिवास मंजू गुप्ता (वय ३७, रा. रामनगर, कल्याण, जि. ठाणे) याला ताब्यात घेण्यात आले.

    आरोपीकडून सुमारे ३ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्ह्यात वापरलेली बजाज अॅव्हेंजर मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली आहे. चौकशीत आरोपीने दोन्ही वाईन शॉपमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे.

    तपासादरम्यान आरोपी मुळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर तसेच पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांत त्याच्याविरुद्ध घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. सानपाडा, नेरुळ, काशिमीरा, नालासोपारा, कोरेगाव पार्क आदी भागांत त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे तो सराईत घरफोड्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, उमाकांत पाटील, किशोर पाटील, रवींद्र कापडणे, प्रशांत परदेशी तसेच नेत्रम विभागातील मुबारक देशमुख यांचा सहभाग होता. जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख तर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचा तपास पोहेकॉ भगवान चौधरी करीत आहेत.

    स्थानिक गुन्हे शाखेच्या या तातडीच्या आणि अचूक कारवाईमुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon: जळगावात ८० कोटींचा महामार्ग अंडरपास

    February 21, 2026

    Jalgaon : शिक्षणासाठी वेटरचे काम करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

    February 21, 2026

    Muktainagar : उड्डाणपुलासाठी साठवलेला माल चोरीला चोरट्यांचा वाहनातून पलायनाचा संशय

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.