Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : जळगावात शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; रॅलीने दुमदुमले शहर
    जळगाव

    Jalgaon : जळगावात शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; रॅलीने दुमदुमले शहर

    saimatBy saimatFebruary 19, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: Shiv Janmotsav celebrations in Jalgaon; City filled with rallies
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     शिवजन्मोत्सवी रॅली, नृत्य आणि  सजीव देखाव्यांनी रंगला सोहळा

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी

    महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहर आज अक्षरशः भगवेमय झाले. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती आणि जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याने संपूर्ण शहरात उत्साह, अभिमान आणि ऐक्याची ऊर्जा निर्माण केली. सकाळच्या पहिल्या प्रहरीपासूनच शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी उसळली होती.

    शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि इमारती भगव्या ध्वजांनी सजल्या होत्या. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. प्रत्येकाच्या मुखी शिवनाम आणि मनात शिवभक्तीचा जाज्वल्य भाव दिसून येत होता.रॅलीची भव्य सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून करण्यात आली.

    पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोर्ट चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक मार्गे ही रॅली शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचली. मार्गभर नागरिकांनी रॅलीवर पुष्पवृष्टी करत शिवरायांना मानवंदना अर्पण केली.

    यंदाच्या रॅलीचे विशेष आकर्षण ठरले ते आदिवासी बांधवांचे पारंपरिक नृत्य. पारंपरिक वेशभूषेत सादर केलेल्या या नृत्याने उपस्थितांचे मन जिंकले. विशेष म्हणजे महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी आदिवासी कलाकारांसोबत नृत्यात सहभागी होत उत्सवात अधिक रंग भरला. तरुणींनी सादर केलेल्या लेझीम पथकातही महापौरांनी स्वतः ठेका धरत उत्साह दुणावला.

    रॅलीत शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांचे सजीव देखावे सादर करण्यात आले. अनेक तरुणींनी जिजाऊंची वेशभूषा करून मातृत्व आणि शौर्याचा संदेश दिला, तर काही तरुण महाराजांच्या वेशात घोड्यावर स्वार होत सहभागी झाले. या देखाव्यांनी उपस्थितांना शिवकालीन इतिहासाची जिवंत अनुभूती दिली.शालेय विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध रांगा लावत भगवे ध्वज हाती घेतले होते. मुखात जयघोष आणि डोळ्यांत अभिमान अशा वातावरणात विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या चरणी मानवंदना अर्पण केली.

    दरम्यान, जीएस मैदान येथे नूतन मराठा महाविद्यालयाच्या वतीने भव्य शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवकालीन शस्त्रास्त्रांचे दर्शन घेण्यासाठी तरुण, अभ्यासक आणि नागरिकांची मोठी गर्दी उसळली. या प्रदर्शनातून शिवकालीन पराक्रमाची परंपरा आणि इतिहासाचा ठसा अधोरेखित झाला.

    संपूर्ण जळगाव शहर आज शिवमय झाले असून सर्वत्र शिवविचारांचा जागर आणि ऐक्याचा संदेश अनुभवायला मिळत आहे. शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने जळगावकरांनी इतिहासाचा अभिमान आणि संस्कृतीची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora : तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याला पाचोरात रंगेहात अटक

    February 19, 2026

    Jalgaon : प्रभाग १३ च्या प्रश्नांवर महापौरांची कडक भूमिका

    February 19, 2026

    Jalgaon : कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात

    February 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.