Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक
    जळगाव

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    saimatBy saimatFebruary 15, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार  महापौर दिपमाला काळे यांची प्लास्टिकविरोधी मोहीम वेगात

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी

    शहरात वाढत्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या एकेरी (सिंगल यूज) प्लास्टिकमुळे निर्माण होत असलेल्या पर्यावरणीय व आरोग्याच्या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या महापौर सौ. दिपमाला काळे यांनी पुढाकार घेत निर्णायक पाऊल उचलले आहे. प्लास्टिक विक्रेते आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीत सिंगल यूज प्लास्टिकवरील बंदीची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, यावर सविस्तर चर्चा होणार आहे.

    महापौरांनी महानगरपालिका प्रशासनाला पाठविलेल्या पत्रात शहरातील सध्याची परिस्थिती अधोरेखित केली आहे. एकेरी वापराचे प्लास्टिक मोकाट जनावरांकडून खाल्ले जात असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये जनावरांच्या पोटात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक साचल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय हेच प्लास्टिक गटारे व नाल्यांमध्ये अडकून पाण्याचा निचरा अडवते. परिणामी पावसाळ्यात रहिवासी भागांत पाणी साचण्याच्या आणि घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडतात.

    प्लास्टिकचे नैसर्गिक विघटन न होत असल्यामुळे ते जमिनीत दीर्घकाळ साचून राहते. त्यामुळे जमिनीची सुपीकता घटते आणि पर्यावरणीय संतुलन बिघडते. शासनाने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी जाहीर केली असली, तरी शहरात अद्याप त्याचा वापर सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत असल्याची खंत महापौरांनी व्यक्त केली आहे.

    ही गंभीर बाब लक्षात घेता प्लास्टिक विक्रेते असोसिएशन आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद आणि समन्वय अत्यावश्यक असल्याचे महापौरांनी नमूद केले आहे. त्यानुसार १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील १७ व्या मजल्यावरील महापौर दालनात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

    या बैठकीस प्लास्टिक विक्रेते असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्याचे निर्देश सहायक आयुक्त (आरोग्य) यांना देण्यात आले आहेत. तसेच महानगरपालिका प्रशासनाने अद्ययावत माहिती, कारवाईचा आढावा आणि आवश्यक अहवालासह बैठकीस हजर राहावे, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

    शहरातील स्वच्छता, नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण या दृष्टीने सिंगल यूज प्लास्टिकवर प्रभावी नियंत्रण अत्यावश्यक असल्याचे महापौरांनी ठामपणे मांडले आहे. या बैठकीत ठोस आणि कडक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, जळगावमध्ये प्लास्टिकविरोधी मोहिमेला नव्या गतीची अपेक्षा आहे.

    पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी आणि शासनाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन व प्लास्टिक विक्रेते यांच्यातील हा संवाद निर्णायक ठरणार आहे. सिंगल यूज प्लास्टिकविरोधात कठोर कारवाईची दिशा या बैठकीतून निश्चित होईल, अशी नागरिकांमध्ये अपेक्षा व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026

    Jalgaon : रेल्वे पुलाजवळ प्रौढाचा मृतदेह; घातपाताचा संशय, खंडेराव नगरात खळबळ

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.