Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Jalgaon : तरुण मजुराचा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
    क्राईम

    Jalgaon : तरुण मजुराचा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

    saimatBy saimatFebruary 14, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: Young laborer commits suicide by hanging himself at his residence
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पिंप्राळा परिसरात धक्कादायक घटना

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी

    शहरातील पिंप्राळा येथील कोळीवाडा परिसरात शनिवारी दुपारी ३८ वर्षीय तरुण मजुराने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. मृतकाचे नाव जगदीश शिवदास सोनवणे असून या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

    जगदीश शिवदास सोनवणे (वय ३८, रा. कोळीवाडा, पिंप्राळा) हे शनिवारी (दि. १४ फेब्रुवारी) दुपारी सुमारे १२:३० वाजता आपल्या घरात होते. या वेळेस अज्ञात कारणांमुळे त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. घटनास्थळी माहिती मिळताच परिसरातील रहिवाशांनी गर्दी केली होती.

    जगदीश हे हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कष्टकरी स्वभावाचे असूनही त्यांनी अचानक हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुषाच्या अकस्मात मृत्यूनंतर कुटुंबावर मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे.

    घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह पुढील तपासासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

    या घटनेने पिंप्राळा परिसरात एकच धक्का निर्माण केला असून, स्थानिक नागरिक आणि कुटुंबीय हादरलेले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : कर्जबाजारी शेतकऱ्याची विषप्राशनातून आत्महत्या

    February 14, 2026

    Metro accident : मुलुंड मेट्रो अपघात मुख्यमंत्र्यांकडून चौकशी आणि ५ लाखांची मदत जाहीर

    February 14, 2026

    Jalgaon : साई गजानन रेसिडेन्सीतील १८ दुचाकी जळून खाक माथेफिरूच्या कृत्याचा संशय

    February 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.