Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : जळगाव मनपावर महायुतीची निर्विवाद सत्ता
    जळगाव

    Jalgaon : जळगाव मनपावर महायुतीची निर्विवाद सत्ता

    saimatBy saimatFebruary 2, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: Mahayuti's undisputed power over Jalgaon Municipal Corporation
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     दीपमाला काळे महापौर, मनोज चौधरी उपमहापौर

    साईमत/जळगाव /प्रतिनिधी

    जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महापौर व उपमहापौरपदाचा सस्पेन्स अखेर संपुष्टात आला आहे. महायुतीकडून या दोन्ही प्रतिष्ठेच्या पदांसाठी उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. विरोधी गटाकडून कोणतेही उमेदवार समोर न आल्यामुळे भाजपच्या दीपमाला मनोज काळे यांची महापौरपदी, तर शिंदेसेनेचे मनोज सुरेश चौधरी यांची उपमहापौरपदी निवड निश्चित मानली जात आहे.

    भाजपचे जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या जळगाव महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते. भाजपने ४६ पैकी सर्व ४६ जागांवर, तर शिवसेनेने २३ पैकी २२ जागांवर विजय मिळवत विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडवला. या दमदार निकालानंतर महापौरपद कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे शहरासह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते.

    महापौरपद हे ‘ओबीसी महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या पदासाठी भाजपकडून उज्ज्वला बेंडाळे व दीपमाला काळे यांची नावे चर्चेत होती. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या वतीने दीपमाला काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. परिणामी, त्यांची महापौरपदी निवड जवळपास निश्चित झाली.

    दरम्यान, महायुतीतील ठरलेल्या सूत्रानुसार उपमहापौरपद शिवसेनेकडे गेले आहे. प्रभाग क्रमांक ८ मधून बिनविरोध निवडून आलेले मनोज सुरेश चौधरी यांना उपमहापौरपदासाठी संधी देण्यात आली असून, त्यांचीही निवड निश्चित मानली जात आहे.

    या नावांची अधिकृत घोषणा करताना मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंद्रकांत सोनावणे, आमदार मंगेश चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    जळगाव महानगरपालिकेच्या इतिहासात ही निवड विशेष मानली जात आहे. दीपमाला काळे आणि मनोज चौधरी हे दोघेही नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आले होते. आता महापौर व उपमहापौर म्हणूनही त्यांची बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता असून, त्यामुळे जळगाव मनपावर महायुतीची पकड अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Bhusawal : संतोषी माता सभागृहाचा ताबा भुसावळ नगरपालिकेकडे

    February 2, 2026

    Jalgaon : जिल्हा नियोजन समितीत पुढील आर्थिक वर्षासाठी मोठा निधी मंजूर

    February 2, 2026

    Jalgaon : अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे विहिरीत पडलेल्या बकरीला नवजीवन

    February 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.