भाजप ६, शिवसेना २ अर्जांसह मैदानात
साईमत/जळगाव /प्रतिनिधी –:
जळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी राजकीय रंगरंगोटी उत्कंठेत भरली. शुक्रवारी, ३० जानेवारी रोजी, भाजपकडून प्रत्येकी ६ अर्ज तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रत्येकी २ अर्ज ताब्यात घेण्यात आले. आता २ फेब्रुवारी रोजी कोण अर्ज भरणार, याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने ४६ तर शिवसेना शिंदे गटाने २२ जागांवर विजय मिळविला. राष्ट्रवादी अजित पवार गट व अपक्षाचे मिळून महायुतीकडे ७० संख्याबळ असल्यामुळे महापौर पद भाजपकडे व उपमहापौर पद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता निश्चित झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया गंगालेली होती. मात्र अंतिम दिवशी, भाजपचे शहर सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांच्यासह गटनेते प्रकाश बालाणी, उपगटनेते नितीन बरडे व प्रतोद डॉ. चंद्रशेखर पाटील मनपाकडे सव्वा बारा वाजता दाखल झाले.
नगर सचिव सतिश शुक्लांकडून प्रकाश बालाणी यांनी महापौरपदासाठी ४ फॉर्म ताब्यात घेतले, तर नितीन बरडे यांनी उपमहापौरपदासाठी ४ फॉर्म घेतले. प्रतोद डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी महापौरसाठी २ आणि उपमहापौरसाठी २ अर्ज ताब्यात घेतले. त्यामुळे महायुतीकडून एकूण १२ अर्ज भरले गेले आहेत.
शिवसेना शिंदे गटाकडून चौथ्यांदा निवडून आलेले नगरसेवक मनोज सुरेश चौधरी १२.३० वाजता दाखल झाले. त्यांनी महापौरपदासाठी २ व उपमहापौरपदासाठी २ अर्ज भरले.
सर्व राजकीय वर्तुळ आता २ फेब्रुवारी रोजी अर्ज भरताना कोण पुढे येतो, याची प्रतीक्षा करत आहेत. महापौर व उपमहापौरपदाच्या लढतीत राजकीय रणनीती, गटसंधी आणि उमेदवारांची निवड हे महत्त्वाचे ठरतील.
