Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड
    क्रीडा

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    saimatBy saimatJanuary 30, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Bhusawal-Jamner: Bold action in Bhusawal-Jamner area; Two youths arrested with three stolen motorcycles
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    स्थानिक गुन्हे शाखेच्या गुप्त माहितीच्या आधारे वाहनचोरांचा पर्दाफाश; नागरिकांमध्ये समाधानाची लहर

    साईमत/भुसावळ /प्रतिनिधी –:

    स्थानिक गुन्हे शाखेने भुसावळ आणि जामनेर परिसरातील चोरीच्या मोटारसायकलींच्या प्रकरणात धाडसी कारवाई करत तीन दुचाकी जप्त केल्या आणि दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले. ही कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली असून यामुळे वाहनचोरीच्या घटनांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

    स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार जामनेर परिसरातील अनुराग लक्ष्मण सूनगत (वय १९, रा. वाकी रोड, हरी ॐ नगर, जामनेर) आणि दर्शन बाप्पू चव्हाण (वय १८, रा. संत सेवालाल नगर, जामनेर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीदरम्यान त्यांनी एका साथीदारासह मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

    तपासात समोर आले की जामनेर पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा रजि. नं. १८/२०२६ आणि ३८/२०२६ (BNS 303(2)) मधील दोन मोटारसायकली तसेच भुसावळ शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा रजि. नं. १७७/२०२४ (BNS 303(2)) मधील एक मोटारसायकल अशी एकूण तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी जामनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे.

    ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक रवी नरवाडे तसेच पथकातील इतर अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.

    वाहनचोरीविरोधात पोलिसांनी घेतलेल्या या सक्रिय भूमिकेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, पोलिसांच्या सततच्या प्रयत्नांमुळे गुन्हेगारांच्या हालचालींवर प्रभावी लगाम बसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Bhusawal:खडका चौक परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य

    March 18, 2026

    Bhusawal : भुसावळच्या मध्यवर्ती भागातील कोट्यवधींची जागा कचऱ्याच्या विळख्यात

    March 16, 2026

    Bhusawal : भुसावळ बस–रेल्वे परिसरात अवैध प्रवासी वाहतूक; सुरक्षा धोक्यात

    March 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.