Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»बायो-डिझेलची साठवणूक करून विक्री करणार्‍यांना अटक
    क्राईम

    बायो-डिझेलची साठवणूक करून विक्री करणार्‍यांना अटक

    saimat teamBy saimat teamOctober 29, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    बडतर्फ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने गावठी कट्टय़ातून केला गोळीबार
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी | पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना माहिती मिळताच बंदी असलेल्या बायो-डिझेलची साठवणूक करून विक्री करणार्‍यांवर एलसीबीने मारलेल्या छाप्यात २० लाख ७५ हजार रूपयांचे बायो-डिझेल जप्त करण्यात आले असून तिघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे.

    जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने भुसावळ ते मुक्ताईनगर महामार्गाला लागून असणार्‍या हॉटेल गरीब नवाज ढाब्याजवळ छापा टाकला. त्यात बायोडिझेलची काळ्या बाजारात चोरटी विक्री करण्यासाठी जमिनीत पुरलेल्या दोन टाक्या भरलेल्या आढळल्या. या कारवाईत २० लाख ७५ हजार रूपयांचे बायो-डिझेल पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी युसूफ खान नूर खान (वय ५४, रा. सिद्धेश्वरनगर, वरणगाव), आफताब अब्दुल कादर राकोटिया (वय २१, रा. हीना पार्क, वरणगाव) व टँकरचालक बेचू मौर्या चंद्रधन मौर्या (वय ४१, रा. खरगपूर, पो. मेहनगर, आजमगड, उत्तर प्रदेश) या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे जालिंदर पळे, युनूस शेख इब्राहिम, सुनील दामोदरे, दीपक पाटील, रणजित जाधव, किशोर राठोड, श्रीकृष्ण देशमुख, दर्शन ढाकणे, भारत पाटील यांनी ही कारवाई केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : प्रभाग ५ आरोग्य कार्यालयात महापौरांचा धडाका कर्मचाऱ्यांना शिस्तीचा इशारा

    February 16, 2026

    Chopda-Virwade : चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी

    February 16, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.