Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Jalgaon:किरकोळ वादातून रिक्षाचालकावर निर्घृण हल्ला
    क्राईम

    Jalgaon:किरकोळ वादातून रिक्षाचालकावर निर्घृण हल्ला

    saimatBy saimatJanuary 5, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: Brutal attack on rickshaw driver over minor dispute
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सुप्रीम कॉलनीतील घटना, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    साईमत /जळगाव/प्रतिनिधी

    जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात किरकोळ कारणावरून रिक्षाचालकाला लाकडी धोपट्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (३ जानेवारी) दुपारी सुमारे २ वाजता घडली. या प्रकरणी रविवारी (४ जानेवारी) दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सचिन राजू राठोड (वय ३२, रा. रायपूर फाटा, कुसुंबा, ता. जळगाव) हा आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतो. नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी तो सुप्रीम कॉलनी परिसरात रिक्षासह उभा असताना मोहित जयसिंग बागडे (रा. सिंधी कॉलनी, जळगाव) याने त्याच्याशी किरकोळ कारणावरून वाद घातला. वादाचे रूपांतर शिवीगाळ व धक्काबुक्कीमध्ये झाले आणि पुढे मोहित बागडे याने लाकडी धोपट्याने सचिन राठोड याच्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात राठोड यांना गंभीर दुखापत झाली.

    घटनेनंतर सचिन राठोड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील करीत आहेत.

    दरम्यान, शहरात किरकोळ कारणांवरून होणाऱ्या वादांना हिंसक वळण लागण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगावात गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा

    March 9, 2026

    Pachora-Bhadgaon : पाचोरा-भडगाव तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी

    March 9, 2026

    Jalgaon : महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले तातडीने कारवाईसाठी निवेदन

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.