Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Jalgaon : गोलाणी मार्केटमध्ये तरुणावर चाकूहल्ला आरोपीस अटक
    क्राईम

    Jalgaon : गोलाणी मार्केटमध्ये तरुणावर चाकूहल्ला आरोपीस अटक

    saimatBy saimatDecember 31, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: Accused arrested for stabbing youth in Golani Market
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत आरोपीला जागीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी

    शहरातील गोलाणी मार्केट परिसरात १८ वर्षीय तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत आरोपीला जागीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

    साई गणेश गोराडे (वय १८, रा. डीएनसी कॉलेजजवळ, जळगाव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास साई हा गोलाणी मार्केट परिसरात होता. यावेळी संशयित आरोपी शुभम सोनवणे (रा. कलिंका माता मंदिर परिसर) याने जुन्या किंवा अज्ञात कारणावरून साईशी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि शुभमने आपल्याकडील चाकूने साईच्या छातीवर सपासप वार केले.

    भरबाजारात अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. मात्र, यावेळी तेथील स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी घाबरून न जाता हिंमत दाखवली. त्यांनी पळून जाणाऱ्या संशयित आरोपी शुभम सोनवणे याला रंगेहात पकडले आणि तातडीने शहर पोलिसांना पाचारण करून त्यांच्या स्वाधीन केले.

    रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या साई बोराडे याला नागरिकांनी तातडीने एका रिक्षामध्ये टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या हल्ल्यामागचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव मनपाचा अर्थसंकल्प उद्या स्थायी समितीत; १४०० कोटींच्या विकास आराखड्याकडे शहराचे लक्ष

    March 10, 2026

    Jalgaon : जळगावात गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा

    March 9, 2026

    Pachora-Bhadgaon : पाचोरा-भडगाव तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.