मान्यवरांच्याहस्ते आचार्य कै.बापुसाहेब गजानन गरुड व बालविर जोरावर सिंह व फतेहसिंह यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले
साईमत/पहूर,ता.जामनेर/प्रतिनिधी :
पाळधी (ता.जामनेर) येथील श्रीमती क.द.नाईक माध्यमिक विद्यालयात वीर बाल दिन सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर होते.
प्रारंभी अध्यक्ष व मान्यवरांच्याहस्ते आचार्य कै.बापुसाहेब गजानन गरुड व बालविर जोरावर सिंह व फतेहसिंह यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास स्नेहदीप गरुड, शेंदुर्णी नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल, भाजपा पश्चिम तालुकाध्यक्ष कमलाकर पाटील, अमर पाटील, सरपंच प्रशांत बाविस्कर, हर्षल चौधरी, तुकाराम निकम, नाना पाटील, सुभाष पाटील, सुमनबाई माळी, बाळू धुमाळ, विलास अहिरे, मनोज नेवे, विनोद पाटील, अतुल बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कमलाकर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चंद्रकांत बाविस्कर यांनी अध्यक्षीस भाषणात गुरुगोविंद सिंहाचा इतिहास सांगितला. रावेर आयोजित खासदार चषक कबड्डी स्पर्धेत विद्यालयातील १७ वर्षे आतील कबड्डी संघाने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल संघाचा व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक एस.एस.चौधरी व वाय.एस पाटील यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम पाचपुते उर्फ माऊली यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एन.पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक एन.टी.पाटील यांच्या मार्गदर्शनाने व सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाची सांगता झाली.
