धनाजी नाना विद्यालयात राष्ट्रीय गणित महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला.
साईमत /फैजपूर/ प्रतिनिधी
खिरोदा (ता.रावेर) येथील धनाजी नाना विद्यालयात राष्ट्रीय गणित महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला.गुजरात कौन्सिल ऑफ सायन्स सिटी आणि अखिल भारतीय रामानुजन गणित क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदाबाद येथे राष्ट्रीय गणित महोत्सव तसेच १९वे राष्ट्रीय गणित संमेलन हे २० ते २२ डिसेंबर २०२५ या कालावधीत उत्साहात पार पडले. या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात भारतातील २१ राज्यांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
या महोत्सवात रमण सायन्स टेक्नॉलॉजी ॲण्ड फाउंडेशन इंडिया व जनता शिक्षण मंडळ, खिरोदा संचलित कलाम सायंटिस्ट सेंटर, खिरोदा येथील १० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ माजी आ. शिरीष चौधरी, संस्थाध्यक्ष कुमार चौधरी, ब्रिगेडियर प्रकाश चौधरी, सचिव सुधाकर झोपे, संचालक प्रा.रमेश झांबरे, अशोक कोलते, मुख्याध्यापिका मनिषा महाजन, बी.एड.कॉलेजच्या प्राचार्या डॉ.लता मोरे, प्राचार्य वाय.व्ही.पाटील, प्राचार्य अतुल मालखेडे, पर्यवेक्षक एस.पी.चौधरी व गुणवंत विद्यार्थी, पालक यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम मान्यवरांनी लोकसेवक मधुकरराव चौधरी व अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कलाम सायंटिस्ट सेंटर समन्वयिका भारती बढे यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका मनिषा महाजन व पर्यवेक्षक एस.पी.चौधरी यांनी केले. यानंतर भारती बढे यांचा सत्कार माजी आ.शिरीष चौधरी यांच्याहस्ते करण्यात आला. त्यानंतर तीन विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले. पालक गुंजन पाटील, शिरीष चौधरी, ब्रिगेडियर प्रकाश चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. कुमार चौधरी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. रमण सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे चेअरमन डॉ.चंद्रमौली जोशी यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व समन्वयिका भारती बढे यांचे फोन वरून अभिनंदन केले.
स्पर्धांमधील यशस्वी सत्कारार्थी विद्यार्थी
युक्ता देवेंद्र पाटील (सावदा), हिमांशू विनोद सरोदे (मस्कावद), डुलेश विजय वारके (मस्कावद), प्रेरणा विकास पाटील (सावखेडा), खुशी रोशन पाटील (मस्कावद), नियती योगेश कोळी (फैजपूर) व कौस्तुभ भूषण पाटील (खिरोदा), गार्णीशा सुयोग पाटील (सावदा), रुद्र महिंद्र महाजन (खिरोदा) आणि पार्थवी कुंदन नेमाडे (चिनावल) या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती भारती बढे यांचे माजी आ.शिरीष चौधरी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आभारप्रदर्शन मुख्याध्यापिका मनिषा महाजन यांनी केले व सूत्रसंचालन मनिषा पाटील यांनी केले.
