Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»Cycling Championship : सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये ‘आकांक्षा’ म्हेत्रेचा झंझावात
    क्रीडा

    Cycling Championship : सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये ‘आकांक्षा’ म्हेत्रेचा झंझावात

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoDecember 26, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सुवर्णसह चार पदकांची ऐतिहासिक कमाई, जळगावच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा 

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

    ५४ व्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये जळगावच्या कन्येने देशपातळीवर आपला ठसा उमटवला आहे. आकांक्षा म्हेत्रे हिने प्रतिष्ठित स्पर्धेत एक सुवर्णपदक आणि तीन कांस्य पदकांची कमाई करत जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

    सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने गेल्या १९ ते २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत उत्तराखंडमधील रूद्रपूर येथील शिवालिका वेलोड्रमवर राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले होते. देशभरातून १४, १६, १८ व सिनिअर गटातील ६०० हून अधिक सायकलपटू स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आकांक्षा म्हेत्रे हिने टीम परस्यूट प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. दुसऱ्या दिवशी झालेल्या टीम स्प्रिंट प्रकारात तिने कांस्यपदक मिळवले. त्यानंतर तिसऱ्या व चौथ्या दिवशी झालेल्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत वैयक्तिक स्प्रिंट व वैयक्तिक टाईम ट्रायल अशा दोन्ही स्पर्धांमध्ये कांस्यपदकांची कमाई करत चार पदके आपल्या नावावर केली.

    सध्या आकांक्षा पुणे येथील बालेवाडी सायकलिंग ट्रॅकवर आगामी राष्ट्रीय स्पर्धांसाठी कठोर सराव करत आहे. तिच्या चमकदार कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या ज्युनिअर मुला-मुलींच्या संघाला रनरअप ट्रॉफीने गौरविण्यात आले. स्पर्धेत महाराष्ट्र संघाला प्रशिक्षक दिपाली शिरधनकर यांचे मार्गदर्शन लाभले. आकांक्षा म्हेत्रे व महाराष्ट्र ज्युनिअर सायकलिंग संघाच्या यशाबद्दल महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विक्रम रोठे, सचिव संजय साठे तसेच क्रीडा प्रबोधिनीच्या प्राचार्य दीपाली पाटील यांनी कौतुक केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव महापालिकेत स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सभापती निवडीची अंतिम तयारी

    February 25, 2026

    Jalgaon : महापौरांचा आवाहन स्थानिक महिला बचत गटांना खरेदीद्वारे पाठबळ द्या!

    February 25, 2026

    Jalgaon: जळगाव जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर; ५० कोटी ९७ लाखांचा विकासाचा दृष्टिकोन

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.