जळगाव, प्रतिनिधी । तांबापुरातील बिस्मिल्ला चौक येथे कोरोना लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांनी उपस्थिती होती.
यावेळी महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, शिवसेना महानगर अध्यक्ष शरद तायडे, नगरसेवक प्रशांत नाईक, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे युवक महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे, तांबापूर शाखाप्रमुख शाहरुख शेख, शिवसेनेचे प्रशांत सुरडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याकचे रियाज काकर, जननायक फाऊंडेशनचे फरीदभाई, सामाजिक कार्यकर्ते वसीम खान, सामाजिक कार्यकर्ते असीफ शाह, सामाजिक कार्यकर्ते सलमान खाटीक, वाहतुक सेनेचे जब्बार भाई, सामाजीक कार्यकर्ते सोनूभाई, सलीम काकर, वसिम काकर, लतीफ भाई, लुकमान शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.