Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : जिल्ह्यात ‘सेवादूत प्रकल्पा’द्वारे शासकीय सेवा घरपोच
    जळगाव

    Jalgaon : जिल्ह्यात ‘सेवादूत प्रकल्पा’द्वारे शासकीय सेवा घरपोच

    saimatBy saimatDecember 24, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: Government services delivered to homes through 'Sevadoot Project' in the district
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सेवादूत प्रकल्पा’ 

    साईमत/जळगाव /प्रतिनिधी : 

    जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सेवादूत प्रकल्पा’ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा आता थेट घरपोच उपलब्ध करून देण्यात येत आहेत. अभिनव उपक्रमाचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांना घेता येणार आहे. योजनेचा मुख्य उद्देश दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच शासकीय कामासाठी प्रत्यक्ष आपले सरकार सेवा केंद्रावर जाणे शक्य नसलेल्या किंवा अर्ज प्रक्रियेबाबत माहिती नसलेल्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळवून देणे हा आहे.
    ‘

    सेवादूत प्रकल्पा’ अंतर्गत नागरिकांनी https://sewadootjalgaon.in या पोर्टलवर आपली अपॉइंटमेंट बुक करायची आहे. त्यानंतर संबंधित भागातील आपले सरकार सेवा केंद्रातील केंद्रचालक (सेवादूत) नागरिकांच्या सोयीच्या वेळेनुसार त्यांच्या घरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाइन अर्ज भरून देणार आहेत. अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित सेवादूतामार्फत आवश्यक प्रमाणपत्रे नागरिकांना घरपोच वितरित केली जाणार आहेत.

    सेवेमध्ये महसूल विभागातील उत्पन्न दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला आदी प्रमाणपत्रांसह इतर विभागांतील सेवा देखील घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सध्या योजनेअंतर्गत १६० नागरिकांनी घरपोच सेवेचा लाभ घेतला आहे. उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घरपोच सेवेसाठी संबंधित आपले सरकार सेवा केंद्रचालक (सेवादूत) यांना नागरिकांनी अतिरिक्त १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

    जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी ‘सेवादूत प्रकल्पा’चा लाभ घेऊन शासकीय सेवांचा सोपा, सुलभ व पारदर्शक अनुभव घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगावात मोठी कारवाई ठरली स्लॉटर हाऊस परिसरातील झोपड्या हटणार

    March 10, 2026

    Jalgaon : जळगाव मनपाचा अर्थसंकल्प उद्या स्थायी समितीत; १४०० कोटींच्या विकास आराखड्याकडे शहराचे लक्ष

    March 10, 2026

    Jalgaon : जळगावात गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.