Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : नायलॉन मांजा वापर टाळण्याबाबत हरित सेनेतर्फे जनजागृतीसह प्रतिज्ञा
    जळगाव

    Jalgaon : नायलॉन मांजा वापर टाळण्याबाबत हरित सेनेतर्फे जनजागृतीसह प्रतिज्ञा

    saimatBy saimatDecember 20, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Green Army pledges to avoid using nylon nets, raising awareness
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये हरित सेनेतर्फे जनजागृती करण्यात आली.

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

    येथील खुबचंद सागरमल विद्यालयातर्फे मकरसंक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा वापरामुळे होणारे धोके लक्षात घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये हरित सेनेतर्फे जनजागृती करण्यात आली. यावेळी नायलॉन मांजामुळे पक्षी, माणसे व प्राणी जखमी होतात. तसेच पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. याबाबत मुख्याध्यापक योगीनी बेंडाळे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

    नायलॉन मांजा वापरणे कायद्याने गुन्हा असून त्यासाठी दंड व शिक्षा होऊ शकते, याची जाणीव करून दिली. तसेच विद्यार्थ्यांनी कागदी, कापसाची किंवा पर्यावरणपूरक मांजा वापरण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी “नायलॉन मांजा वापरणार नाही व इतरांनाही वापरू देणार नाही” अशी प्रतिज्ञा घेतली.

    शाळा परिसरात नायलॉन मांजा वापराविरोधात फलक लावून जनजागृती करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण झाली. यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका योगीनी बेंडाळे, कल्पना देवरे, राष्ट्रीय हरित सेना प्रमुख प्रवीण पाटील, अजय पाटील, मंगला सपकाळे आदी शिक्षकांनी सहकार्य केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगावात आरपीएफ जवानाच्या घरात धाडसी चोरी

    March 10, 2026

    Jalgaon:जळगावात मोठी कारवाई ठरली स्लॉटर हाऊस परिसरातील झोपड्या हटणार

    March 10, 2026

    Jalgaon : जळगाव मनपाचा अर्थसंकल्प उद्या स्थायी समितीत; १४०० कोटींच्या विकास आराखड्याकडे शहराचे लक्ष

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.