सहारा नसलेल्या महीला तसेच वृद्ध ,निराधार मनोरुग्ण यांना थंडी पासुन बचाव म्हणून ब्लॅकेट चे वाटप केले
साईमत/जामनेर /प्रतिनिधी :
सद्या हिवाळ्याचे दिवस असल्याने कडाक्याची थंडीत उघड्यावर राहणारे, आर्थिकदृष्टा दुर्बल कुटुंबे,वृद्ध निराधार व्यक्ती यांना थंडीचा जास्त त्रास सहन करावा लागत असून त्यांना मायेची उब मिळावी या साठी चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशनने ग्रामीण भागातील गरजूंना मोफत ५०० ब्लॅकेटचे वाटप करून त्यांच्या जीवनात मायेची उब निर्माण करण्याचा काहीसा प्रयत्न बोदवड केला आहे.
चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन चे अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते संवेदनशील व्यक्तीमत्व संदीप सिंग यांनी आत्मसन्मान फाऊंडेशन बोदवड येथील कोणाचाही सहारा नसलेल्या महीला तसेच वृद्ध ,निराधार मनोरुग्ण यांना थंडी पासुन बचाव म्हणून ब्लॅकेट चे वाटप केले असून भविष्यात या निराधार व मनोरुग्ण ना चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन नेहमीच त्यांचे लागणारे साहित्य चे मदत करत राहणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. तसेच भविष्यात असे उपक्रम राबवुन निराधार लोकांच्या आयुष्यात उबदारपणा आणि आनंद आणण्याचा संकल्प आम्ही करु असे मत संदीप सिंग यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशनचे स्वयंसेवक यांचे बोदवड येथील आत्मसन्मान टिम ने मनापासून आभार मानले . यावेळी अमरिन पेंटर ट्रस्टी, रिना नवले, राकेश रोशन, वैभव खेडेकर, सोपान राऊत , वामन चव्हाण , ईश्वर कोळी , राहूल रॉय मुळे हे फाऊंडेशन चे स्वयंसेवक उपस्थित होते.
