Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»तब्बल तीन वर्षांनी लालपरीचा प्रवास महागला
    राज्य

    तब्बल तीन वर्षांनी लालपरीचा प्रवास महागला

    saimat teamBy saimat teamOctober 26, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    रत्नागिरी, वृत्तसंस्था । तब्बल तीन वर्षानंतर एसटीच्या तिकीटात भाडेवाढ झालीये. यामुळे मुंबई पुण्याचा प्रवास तब्बल 75 रुपयांनी महागणार आहे. तर कोल्हापूरच्या प्रवासासाठी 30 रुपयांनी महागणार आहे. कोकणातून मुंबईत जाण्यासाठी आता 450 ऐवजी 525 रुपये मोजावे लागणार आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्याअंतर्गत प्रवास 5 रुपयांपासून 40 रुपयांपर्यत महागणार आहे.

    एसटी महामंडळाकडून भाडेवाढ लागू

    इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ, टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर चांगलाच भार पडला आहे. हा भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली आहे. एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच 17.17 टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे.

    25 ऑक्टोबर 2021 च्या मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू

    25 ऑक्टोबर 2021 च्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू झाली. नव्या निर्णयानुसार तिकीट किमान 5 रूपयाने वाढणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर 5 ते 10रूपयांनी कमी करण्यात आले आहेत.

    तिकीट दरात वाढ नेमकी का केली ?

    गेल्या 3 वर्षात इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळाने कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती. इंधनाच्या वाढत्या दराचा बोझा झेलत एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकिट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे.

    शिवशाही, शिवनेरी बसला पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नाही

    नव्या तिकिट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच 6 किमी नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ 5 रुपयाच्या पटीत असून 25 ऑक्टोबर 2021 च्या मध्यरात्रीपासून (25 आणि 26 ऑक्टोबरच्या मध्यरात्री) लागू होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Budget 2026 : अर्थसंकल्प 2026: निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; स्वस्त काय, महाग काय?

    February 1, 2026

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026

    Big Breaking! राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जि.प.–पं.स. निवडणुकीची रणधुमाळी सुरू

    January 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.