ढोल-ताशांच्या गजरात, टाळ मृदुंगाचा मंगलमय नाद, कलशधारी महिला, निशानदारी पुरुष, लेझीम पथके,सजीव देखाव्यांसह पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येईल.
साईमत/ पारोळा/प्रतिनिधी :
सावदा येथे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पादुका दर्शन सोहळा सोमवारी दि.१५ रोजी सकाळी ९ वाजता शासकीय विश्रामगृहासमोर आयोजित केला आहे.सकाळी ९ वाजता ढोल-ताशांच्या गजरात, टाळ मृदुंगाचा मंगलमय नाद, कलशधारी महिला, निशानदारी पुरुष, लेझीम पथके आणि विविध सजीव देखाव्यांसह रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजींच्या पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येईल.
त्यानंतर पादुकांना संत पिठावर विराजमान करून स्वागत आरती आणि विविध मंत्रघोषाने पूजन करून विशेष अध्यात्मिक प्रवचन होणार आहे. तसेच भाविकांसाठी उपासक दिक्षा आणि गुरूपूजन संपन्न होणार आहे. जास्तीत जास्त भाविकांनी उपासक दिक्षा घेण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सेवा समितीतर्फे करण्यात आले आहे. सोहळ्यात उपस्थित भक्तगणांना जगद्गुगुरूंच्या सिद्ध पादुकांचे दर्शन आशिर्वाद प्राप्त करण्याची संधी मिळणार आहे.
