‘जळगाव प्रथम’च्या मोहिमेला प्रतिसाद ; सुभाष चौकात उद्या मोहीम
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील वाढत्या नागरी समस्या दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप करून तसेच त्यांच्या उपाययोजनांमध्ये निष्क्रीय ठरत असल्याचे म्हणत, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या हटावसाठी “आयुक्त हटाव -जळगाव बचाव” ही स्वाक्षरी मोहीम ९ डिसेंबर रोजी मनपाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उत्साहात पार पडली.
मोहिमेला अराजकीय व्यासपीठ ‘जळगाव प्रथम’ तर्फे आयोजन केले आहे. शहरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मनपाच्या कारभारामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी उपस्थित राहून स्वाक्षऱ्या नोंदवल्या आणि आपला निषेध व्यक्त केला. मोहिमेचे महत्व प्रमुख वृत्तवाहिन्यांनी टिपले व नागरिकांच्या समस्या लोकांसमोर मांडल्या.
कार्यक्रमात जळगाव प्रथमचे संयोजक माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर, माजी उपमहापौर करीम सालार, साबीर आबादी, रामजी सूर्यवंशी, अनिल नाटेकर, सुनील ठाकूर, ॲड. आनंद कोचुरे, धनंजय चौधरी, विनोद शर्मा, नितीन पाटील, अविनाश चौधरी, सावित आबादी, जयसिंग वाघ, विजय सोनवणे, दिलीप खडके, शोभा पाटील, वैशाली चव्हाण, मनोज पाटील, रावण ठाकरे, आनंद गोरखे, ॲड. सागर शिंपी, पांडुरंग पाटील, राजेश पाटील, पुरुषोत्तम रावजी, कैलास वाणी, भीमराव मराठे, इरफान सालार, कादिर अमन, मुस्तफा, स्वप्निल सलाम, जयश्री पाटील यांसारखे मान्यवर उपस्थित होते. ही मोहीम पुढील टप्प्यात गुरुवारी, ११ डिसेंबर रोजी सुभाष चौकात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत सुरू राहणार आहे.
सर्वांनी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
आपली एक स्वाक्षरी जळगाव शहराच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा देऊ शकते. सर्वांनी सामूहिकपणे या मोहिमेत सहभागी व्हावे, असे जळगाव प्रथमच्यावतीने नागरिकांना आवाहन केले आहे. मोहिमेमुळे नागरिकांना त्यांच्या शहरातील समस्यांकडे लक्ष वेधण्याची संधी मिळत आहे. प्रशासनावर दबाव निर्माण करण्यासाठी ही उपक्रमात्मक पायरी महत्त्वाची ठरत आहे.
