
फैजपूरमध्ये कोळी समाजातर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
साईमत/ फैजपूर /प्रतिनिधी :
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील तीन वर्षीय यज्ञा जगदीश दुसाने या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण समाजाला हादरवून सोडले आहे. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन फैजपूर शहरातून आदिवासी टोकरे कोळी समाजातर्फे प्रांताधिकारी बबन काकडे यांना सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, यज्ञा दुसाने या तीन वर्षांच्या निरागस बालिकेवर नराधमाने अमानुष अत्याचार करून तिची निर्दयपणे हत्या केली. या राक्षसी कृत्याचा कोळी समाजाकडून जाहीर निषेध करण्यात आला असून, प्रशासनाने आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या माध्यमातून पीडित बालिका व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणीही निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
निवेदन देताना कोळी समाज अध्यक्ष दिलीप कोळी, गणेश गुरव, अतुल कोळी, संतोष कोळी, विजय कोळी, सागर कोळी आदी कोळी समाजबांधव उपस्थित होते.
01


