Charmikar Vikas Sangh : चर्मकार विकास संघातर्फे आयोजित वधू-वर-पालक परिचय मेळाव्यात ५३५ वधू-वरांचा परिचय

0
4

एकात्मता, संस्कारासह समाजहिताचा संदेश देणारा ठरला मेळावा

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

चर्मकार विकास संघातर्फे राज्य व परराज्यातील वधू-वरांच्या प्रथम पसंतीचा तृतीय वधू-वर व पालक परिचय मेळावा जळगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटजवळील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात रविवारी, २ नोव्हेंबर रोजी उत्साहासह भावनिक वातावरणात पार पडला. मेळाव्यास समाजबांधवांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. मेळाव्यात ५३५ वधू-वरांनी परिचय करुन दिला. एकात्मता, संस्कारासह समाजहिताचा संदेश देणारा मेळावा भावनिक वातावरणात पार पडला. समाजातील सर्व थरातील बांधवांचा सहभाग पाहता, हा मेळावा चर्मकार समाजाच्या ऐक्य, प्रगती आणि नव्या दिशेचा सुंदर आरंभ ठरला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संजय सावकारे होते.

मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून आ.राजू मामा भोळे, संस्थापक प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, माजी महापौर तथा जिल्हा शिवसेना प्रमुख विष्णू भंगाळे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, डॉ. संदीप भारूळे, सरपंच राजेश वाडेकर, मुख्य अभियंता राजेंद्र बाविस्कर, ऊर्जा विभागाचे निरीक्षक गणेश सुरडकर, प्रदेश उपाध्यक्ष विश्वनाथ सावकारे, राज्यकारणी सदस्य संजय वानखेडे, जिल्हाध्यक्ष ॲड. डॉ. अर्जुन भारुडे, उपकार्यकारी अभियंता महेश तांबे, जिल्हा सचिव प्रा. धनराज भारुडे, प्रदेश सहसचिव ॲड. चेतन तायडे, वसंतराव नेटके, प्रकाश रोजतकर, काशीनाथ इंगळे, रामदास सावकारे, अशोक सावकारे, कमलाकर ठोसर, माजी नगरसेविका सुरेखा तायडे, रामदास गाडेकर, सुखदेव काटकर, खंडू पवार, विजय पवार, मनोज सोनवणे, कैलास वाघ, अशोक भारुळे, रतीराम सावकारे, गजानन दांडगे, निवृत्ती सूर्यवंशी, केशव ठोसरे, संदीप ठोसर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात संत रविदास महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजनासह दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी समाजाच्या विवाह क्षेत्रातील आधुनिकतेच्या दिशेने एक पाऊल म्हणून ‘ऋणानुबंध’ डिजिटल पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मेळाव्यात विवाहित, घटस्फोटित, विधवा-विधुर तसेच अपंग वधू-वरांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सर्व वधू-वरांना आपला परिचय देण्याची सुवर्णसंधी मिळाली. मान्यवरांनी समाजातील उपक्रमाचे कौतुक करताना गुरु रविदास महाराजांचा भव्य पुतळा आणि सभागृह बांधणीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच युवकांनी फक्त नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी विश्वनाथ सावकारे, संजय वानखेडे, ॲड. डॉ. अर्जुन भारुडे, प्रकाश रोझतकर, कमलाकर ठोसर, राजेश वाडेकर, मनोज सोनवणे, ज्योती निंभोरे, गणेश काकडे, डी. बी. मोरे, गजानन दांडगे, संदीप ठोसर, योगिता वानखेडे, सुनीता वानखेडे, लता सावकारे, प्रा. संदीप शेकोकार, पंकज तायडे, शिवदास कळसकर, उषा दांडगे, संगीता चिमणकर, यशवंत वानखेडे, भागवत सावकारे, प्रवीण बाविस्कर, लोकेश भारुडे, सुजल सावकारे, रोहित सावकारे, पुरुषोत्तम चिमणकर आदींनी परिश्रम घेतले.

यांचे लाभले सहकार्य

कार्यक्रमातील स्नेहभोजनासह फराळाची जबाबदारी माजी नगरसेविका सुरेखा तायडे यांनी तर टेन्ट हाऊस व्यवस्थापनाची जबाबदारी राजेश वाडेकर यांनी पार पाडली. सभागृहाची व्यवस्था विष्णू भंगाळे यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली. प्रास्ताविक संजय खामकर, डॉ. संजय भटकर, सूत्रसंचालन संजय वानखेडे, प्रा. धनराज भारुडे, डॉ. संजय भटकर तर ॲड. डॉ. अर्जुन भारुडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here