Faizpur Digital Board : “‘दिशा’ नव्हे तर ‘दृष्टी’ बदलणारे फलक — फैजपूरमध्ये नव्या युगाची सुरुवात”

0
14

साईमत फैजपूर प्रतिनिधी

फैजपूर शहरात शहरी विकासाला वेग देण्यासाठी आणि नागरिकांना सोयीस्कर दिशा दाखवण्यासाठी प्रभाग क्रमांक १० मधील विविध कॉलनी व मंदिर परिसरात डिजिटल दिशादर्शक फलकांचे अनावरण (Faizpur Digital Board Inauguration,) आमदार अमोल जावळे (Amol Jaware MLA) यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

या उपक्रमामागे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Minister Raksha khadse) आणि आमदार अमोल जावळे यांचे मार्गदर्शन तर यावल तालुका भाजपा प्रज्ञावंत आघाडीचे अध्यक्ष सिद्धेश्वर वाघुळदे सर यांचा पुढाकार होता. शहरातील विविध कॉलनींमध्ये प्रथमच अशा प्रकारचे डिजिटल फलक बसवले गेल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

आधुनिक फलकांनी बदलली शहराची ओळख

शहरातील जानकी नगर, लक्ष्मी नगर, आसाराम नगर, हनुमान नगर, आशिष सराफ नगर, खंडोबा देवस्थान, राजबाग परिसर, वृंदावन कॉलनी, सानेगुरुजी नगर आणि खंडोबा नगरी या भागांमध्ये अत्याधुनिक डिजिटल दिशादर्शक फलक बसवण्यात आले.

यामुळे नागरिकांना कॉलनी व मंदिरांची नावे सहज ओळखता येतील. हे फलक मुंबई-पुणे शहरांच्या आधुनिक नमुन्यानुसार तयार करण्यात आले असून, फैजपूर शहराच्या (Faizpur Smart City,) सौंदर्यात भर पडली आहे.

मंदिरांना स्वतंत्र फलक

नीलकंठेश्वर मंदिर, हनुमान मंदिर, महालक्ष्मी मंदिर, स्वामीनारायण मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर या प्रमुख धार्मिक स्थळांनाही दिशादर्शक फलक देऊन श्रद्धाळूंसाठी सोयीसुविधा वाढविण्यात आल्या आहेत.

सिद्धेश्वर वाघुळदे यांचा पुढाकार

या संपूर्ण उपक्रमाची जबाबदारी यावल तालुका भाजपा प्रज्ञावंत आघाडीचे अध्यक्ष सिद्धेश्वर वाघुळदे सर (Siddheshwar Waghulde BJP) यांनी स्वखर्चाने घेतली. त्यांनी प्रभाग क्रमांक १० मधील सर्व कॉलनींमध्ये स्वच्छता, विकास आणि डिजिटल सुधारणा यांची मालिका सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

“फैजपूर शहर स्वच्छ, सुंदर आणि दिशादर्शक बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
नागरिकांसाठी सोयीस्कर सुविधा निर्माण करून शहराचे रूपांतर आधुनिकतेकडे नेणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
— सिद्धेश्वर वाघुळदे सर

कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती

या अनावरण सोहळ्याला माजी नगराध्यक्ष निलेश राणे, चंद्रशेखर चौधरी, अनंत नेहेते, संदीप भारंबे, नितीन राणे, नितीन नेमाडे, राकेश जैन, राजेश महाजन, जयश्री चौधरी, लता मेढे, भारती पाटील, रामा होले, रवी होले, भूषण चौधरी, किरण चौधरी, संतोष मेढे, प्रफुल्ल नेहते, मनोज चौधरी यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

समाजकार्याचा विस्तार

या प्रसंगी परिसरात ५०० आयुष्मान कार्डांचे मोफत वाटप, तसेच लक्ष्मी नगर आणि आशिष सराफ कॉलनीतील गटारींची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
सिद्धेश्वर वाघुळदे सर यांनी सांगितले की, “प्रभाग क्रमांक १० हा शहरातील आदर्श आणि स्वच्छ प्रभाग म्हणून ओळखला जावा, यासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करत आहोत.”

फैजपूरचा नवा चेहरा

डिजिटल दिशादर्शक फलकांमुळे फैजपूर शहरात दिशानिर्देश अधिक स्पष्ट, सुव्यवस्थित आणि नागरिकांसाठी सोयीस्कर झाले आहेत.
हा उपक्रम शहराच्या डिजिटल आणि शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here