Cotton Marketing Corporation : मालमत्ता विक्रीचे मनसुबे उधळले : कॉटन मार्केटिंग संस्थेच्या इमारत विक्रीचा प्रस्ताव विविध त्रुट्या

0
11

सहकार विभागाने कॉटन मार्केटिंग इमारत विक्रीची परवानगी नाकारली

साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : 

येथील जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग संस्थेच्या इमारत विक्रीचा प्रस्ताव विविध त्रुट्या दर्शवित सहकार विभागाच्या जळगाव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने नाकारला आहे. सहकार विभागाच्या अशा भूमिकेमुळे संस्थेची मालमत्ता (इमारत) विक्री करण्याचे संबंधित संस्था चालकांचे मनसुबे का प्रकारे उधळले गेले आहे.

प्राप्त माहितीनुसार, जळगाव शहराच्या मोक्याच्या भागात असलेली जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग संस्थेची इमारत विक्री करण्याची परवानगी संबंधित संस्थेच्या चालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे मागितली होती. परवानगी संबंधात आलेल्या प्रस्तावाची जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सखोल चौकशी केली. त्यात संस्थेची इमारत विक्री करण्याची कारणे परवानगी प्रस्तावात दिलेली नाही. कॉटन मार्केटिंग संस्थेचे दोन वर्षापासून शासकीय लेखापरीक्षणही झालेले नसल्याचे आढळून आले आहे .

अपूर्ण माहितीवर विक्रीची परवानगी कशी देता येईल…?

इमारत विक्री का करावी लागत आहे, त्याची कारणे संबंधितांनी परवानगी प्रस्ताव दिलेली नाहीत. तसेच संस्थेकडे किती देणे-घेणे आहे.संस्थेची आर्थिक स्थिती आदी महत्त्वाची माहिती दिलेली नाही. त्यामुळे अपूर्ण माहितीवर विक्रीची परवानगी कशी देता येईल…? असा प्रश्न उपनिबंधक कार्यालयाने उपस्थित करत परवानगीचा प्रस्तावच परत केला आहे. जोपर्यंत त्रुटींची पूर्तता होत नाही, तोपर्यंत प्रस्तावाचा विचार करता येत नाही, असेही कार्यालयाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here