Karate And Skating Players : पोलीस स्पोर्ट्स कराटे, स्केटिंगच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

0
14

शालेय कराटे, स्केटिंग स्पर्धेत विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. त्यात नुकत्याच धुळे येथे पार पडलेल्या विभागीय वूशू स्पर्धेत पोलीस क्लासमधील कराटेची खेळाडू मनस्वी तायडे हिने सुवर्णपदक घेऊन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सलग तिसऱ्यावर्षी आपले पद निश्चित केले आहे. ९ ते १२ ऑक्टोंबर दरम्यान संभाजीनगर गोवरखेडा येथे होत असलेल्या राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत मनस्वीची निवड झाली आहे. तसेच शालेय कराटे, स्केटिंग स्पर्धेत विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड झाली आहे.

कराटेत कौस्तुभ जंजाळे, कार्तिक शिंदे, महेश वाघ, श्रेयस परदेशी, कुणाल बाविस्कर, नितीश भोसले, संकेत पवार, अदिती खंगार, आराध्या तोडा, नेहा अहिरराव, मानसी सूर्यवंशी, निशू कोळी, प्राची पाटील, मानवी पाटील, साक्षी बाविस्कर, प्रांशी सोनवणे, मनस्वी तायडे यांची पुढील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्केटिंगमध्ये कार्तिक चौगले, कौस्तुभ चौगले, श्रवण महाले, मानसी चौधरी, तेजल सूर्यवंशी, मानसी सूर्यवंशी यांची पुढील विभागीय क्रीडा स्पर्धेत निवड झाली आहे.

यांचे लाभले मार्गदर्शन

खेळाडूंंना प्रशिक्षक म्हणून अश्विनी निकम, जागृती काळे, राजेंद्र जंजाळे, स्वप्नील निकम, प्राजक्ता सोनवणे, प्रथमेश वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजयी खेळाडूंचे जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक अरुण आव्हाड, जळगाव भागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here