आ.अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
साईमत/ फैजपूर/प्रतिनिधी :
सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने शहरातील ४ हजार नागरिकांना मोफत आयुष्मान कार्ड उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाची सुरुवात रविवारी शुभ दिव्य मंगल कार्यालयात करण्यात आली. हा उपक्रम सिद्धेश्वर वाघुळदे यांच्या पुढाकाराने आणि आ.अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
आरोग्य संरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त असलेले हे कार्ड नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. नागरिकांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन श्री.वाघुळदे यांनी केले. शिबिराच्या प्रारंभीपासूनच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष निलेश राणे, सिद्धेश्वर वाघुळदे, अनंत नेहेते, संदीप भारंबे, चंद्रशेखर चौधरी, निलेश चौधरी, नितीन राणे, यशवंत तळेले न्हावी, प्रवीण वारके न्हावी, उमेश बेंडाळे न्हावी, शहराध्यक्ष पिंटू तेली, जयश्री चौधरी, भारती पाटील आदी मान्यवर उपस्थित