अपर्णा येवलकर प्रथम, जळगावच्या किर्ती पाटील द्वितीय, श्रावणी खातळे तृतीय
साईमत/नाशिक/प्रतिनिधी :
तालुक्यातील ओझर येथे बीएसएफ बहुउद्देशीय संस्था अमरावती व उपेक्षित नायक न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने “पुस्तकांचे हॉटेल” या ठिकाणी आवाज लेखणीचा राज्यस्तरीय काव्य संमेलन व पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. संमेलनात इगतपुरी (धामणगाव) येथील कविवर्य ॲडव्होकेट महेंद्र बर्वे यांच्यासह राज्यभरातील ४३ कवींनी आपल्या कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षस्थानी नंदू सानप होते. काव्य संमेलनात विजेत्यांमध्ये अपर्णा येवलकर (येवला) प्रथम, किर्ती अरुण पाटील (जळगाव) द्वितीय तर श्रावणी खातळे (नाशिक) तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव नागरे, डॉ. अश्विनीताई बोरसे, नितीन डांगळे तसेच अभिनेत्री केतकी गावंडे, सचिन अहिरे यांची विशेष उपस्थिती लाभली. यशस्वीतेसाठी मुख्य आयोजक म्हणून भूषण सरदार, वैशाली सोनवणे, अश्विनी सांगळे यांनी परिश्रम घेतले.