Sambhaji Brigade’s Protest In Jalgaon : शेतकऱ्यांच्या प्रश्नासह आरक्षणासाठी जळगावात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

0
68
(c)Kaushik K Shil +919903371497

ओला दुष्काळ जाहीर करा : ५० हजार हेक्टरी भरपाईची मागणी

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि इतर ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडने गुरूवारी, २१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय ‘लक्षवेध’ आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष (जळगाव पूर्व) प्रदीप गायके, जिल्हाध्यक्ष (पश्चिम) विजय पाटील आणि महानगर अध्यक्ष (जळगाव) राकेश पाटील यांनी केले. त्यांच्यासोबत लीना पवार, शीतल पाटील यांच्यासह मराठा सेवा संघाचे सुरेश पाटील, सुरेंद्र पाटील यांच्यासह इतर अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी कर्जमाफी, ऊस, कांदा, कापूस आणि दूध दराचे प्रश्न, तसेच मराठा व इतर आरक्षण, निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यासारख्या मागण्या प्रकर्षाने मांडण्यात आल्या. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, अशी मुख्य मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने तातडीने पाऊले उचलावीत, असे आवाहन आंदोलकांनी केले.

मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच राहण्याचा सरकारला इशारा

संभाजी ब्रिगेडने आंदोलनातून सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे की, जोपर्यंत शेतकऱ्यांसह समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत त्यांचा लढा सुरूच राहील. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here