Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Neri Primary Health Center : नेरी प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘उत्कृष्ट आरोग्य निरीक्षक’ पुरस्कार
    जळगाव

    Neri Primary Health Center : नेरी प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘उत्कृष्ट आरोग्य निरीक्षक’ पुरस्कार

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 16, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक विभागातर्फे यंदाचा मानाचा पुरस्कार प्रदान

    साईमत/जामनेर/प्रतिनिधी : 

    नाशिक विभागामार्फत दरवर्षी प्रदान केला जाणारा यंदाचा मानाचा ‘उत्कृष्ट आरोग्य निरीक्षक’ पुरस्कार २०२४-२५ या वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील नेरी प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील नवनियुक्त आरोग्य निरीक्षक सोपान विठ्ठल राठोड यांनी त्यांच्या पहिल्याच वर्षात आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट नियोजनबद्ध व परिणामकारक कार्य करून हा सन्मान पटकावला आहे, ही जामनेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण साधलेली प्रगती उल्लेखनीय ठरली आहे. जळगाव जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी राठोड यांच्या संपूर्ण दप्तराची तपासणी केल्यावर ती पूर्णपणे योग्य असल्याचे आढळले. त्यांनी नाशिक आरोग्य सेवेचे सहाय्यक संचालक डॉ. विवेक खतगावकर यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्यावर डॉ. खतगावकर यांनी त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांची पुरस्कारासाठी निवड केली.

    नाशिक येथे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात नाशिक आरोग्य सेवेचे आरोग्य उपसंचालक डॉ.कपिल आहेर, डॉ.विवेक खतगावकर यांच्या हस्ते राठोड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी त्यांच्या कामाची व पुरस्काराची दखल घेत शुभेच्छा दिल्या. त्यांच्या यशाबद्दल अधिकारी, सहकारी कर्मचारी आणि संपूर्ण आरोग्य विभागाकडून कौतुक होत आहे.

    यांचे लाभले सहकार्य

    श्री.राठोड यांच्या यशात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, नेरी बु. चे प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल देसले, डॉ. नरेश पाटील, डॉ.कांचन गायकवाड, तालुका आरोग्य सहाय्यक बशीर पिंजारी यांच्यासह तालुक्यातील सर्व आरोग्यातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन तर नेरी येथील संपूर्ण वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.