Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»बालविवाहमुक्त जिल्हा होण्यासाठी मुलींच्या सक्षमीकरणावर भर द्यावा – जिल्हाधिकारी
    जळगाव

    बालविवाहमुक्त जिल्हा होण्यासाठी मुलींच्या सक्षमीकरणावर भर द्यावा – जिल्हाधिकारी

    saimat teamBy saimat teamOctober 18, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण कमी करून जळगाव जिल्हा बालविवाह मुक्त करणे आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी समाजातील प्रत्येकाने पुढे येवून एकत्रितरीत्या बालविवाह विरोधात काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

    महिला व बालविकास विभाग, यूनिसेफ व सेंटर फॉर सोशल ॲण्ड बिव्हेवियर चेंज कम्युनिकेशन (एसबीसी-३) यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलनासाठी प्रशिक्षकांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालकल्याण) देवेंद्र राऊत, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी योगेश मुक्कावार, यूनिसेफ एसबीसी-३ चे निशितकुमार, प्रिया आरते, मीनाकुमारी यादव, पूजा यादव, किरण बिलोरे, नंदू जाधव, नीलेश सातपुते आदी उपस्थित होते.

    जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिया यांनी बालविवाह रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. बालविवाह निर्मूलनासाठी जिल्हा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यात ग्रामपंचायत विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, जिल्हा बालसंरक्षण कक्ष या विभागांचा समावेश असून या विभागांसोबत मुलींच्या सक्षमीकरणासाठी एकत्रितरीत्या काम करून कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यावेळी जळगाव जिल्हा बालविवाह मुक्त करू अशी शपथ सर्व सहभागींनी घेतली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : प्रभाग ५ आरोग्य कार्यालयात महापौरांचा धडाका कर्मचाऱ्यांना शिस्तीचा इशारा

    February 16, 2026

    Chopda-Virwade : चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी

    February 16, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.