Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»नंदूरबार »Amlan ZP School : स्वयंसेवकाच्या मदतीने आमलाण जि.प.च्या शाळेत होतेय रात्र अभ्यासिका
    नंदूरबार 

    Amlan ZP School : स्वयंसेवकाच्या मदतीने आमलाण जि.प.च्या शाळेत होतेय रात्र अभ्यासिका

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 1, 2025Updated:August 1, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दोन वर्षापासून दररोज नियमित राबविला जातोय उपक्रम

    साईमत/नंदुरबार/प्रतिनिधी :

    नवापूर तालुक्यातील आमलाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक बाळकिसन ठोंबरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी अभ्यासिका सुरू केल्या आहेत. त्यासाठी स्वयंसेवक प्रियंका गावित, बबीता वसावे, रूपाली वसावे, सुवर्णा वसावे, वैशाली वसावे, मीना कोकणी यांची स्वयंसेवक म्हणून नेमणूक केली आहे. त्यांनीही स्वयंप्रेरणेने होकार देत रात्र अभ्यासिका सुरू केल्या आहेत. गेल्या दोन वर्षापासून दररोज नियमित रात्र अभ्यासिका घेतली जात आहे. अशा स्तुत्य उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे, विस्तार अधिकारी रमेश देसले, केंद्रप्रमुख भगवान सोनवणे यांनी कौतुक केले. सर्व स्वयंसेवकाचा सांस्कृतिक कार्यक्रमाच्यावेळी सत्कार करून कौतुक केले आहे.

    शाळेतून दिलेला अभ्यास विद्यार्थी रात्र अभ्यासिकेत एकत्र बसून पूर्ण करतात. काही अडचण आल्यास स्वयंसेवक त्यांना मदत करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा घरचा अभ्यास व सराव होऊ लागल्याने गुणवत्तेत वाढ होण्यास मदत झाली. स्वयंसेविका ह्या डीएड्‍ व पदवीधारक असल्याने त्यांच्या अनुभव, शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय गावित, सरपंच अंजना वसावे, शिक्षण प्रेमी विलास वसावे, अमृत गावित हे विविध साहित्य घेऊन मदत करतात. तसेच उपक्रमात सहभागी स्वयंसेवकांना शाळेचे मुख्याध्यापक बाळकिसन ठोंबरे, शिक्षिका अलका पाडवी, लिना गावित हे मदत करतात.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : पत्रकारांना कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगावर स्वार होणे गरजेचे-डॉ. सदानंद मोरे

    January 6, 2026

    Jalgaon:शेठ ला.ना.सार्व.विद्यालयात किशोर महोत्सवाचा बक्षीस वितरणाने समारोप

    December 29, 2025

    Group Discussion Program : विद्यापीठात वीर बाल दिवसानिमित्त ग्रंथ प्रदर्शनासह गट चर्चा कार्यक्रम

    December 26, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.