लेवा सखी घे भरारी यांच्यावतीने ‘भव्य दीपावली उत्सव’ (व्हिडिओ)

0
35
लेवा सखी घे भरारी यांच्यावतीने 'भव्य दीपावली उत्सव' (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सरदार वल्लभभाई पटेल हॉल (लेवा भवन) येथे लेवा सखी घे भरारी यांच्यावतीने भव्य दिपावली उत्सवाचे महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल हॉल (लेवा भवन) येथे १६ व १७ ऑक्टोंबर सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत भव्य दीपावली उत्सवाचे ( प्रदर्शन व विक्री) आयोजन करण्यात आले असून यात 48 स्टॉल व खाद्यपदार्थ 6 स्टॉल असणार आहेत. या उत्सवाचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक अरुण बोरोले उपस्थित होते.

या उत्सवाला
अध्यक्ष ऍड. भारती ढाके, सचिव निलम किनगे, उपाध्यक्ष डॉ. स्मिता पाटील, कोषाध्यक्ष भारती चौधरी, चित्रा महाजन, वैशाली कोळंबे, सविता भोळे, कांचन राणे, वनिता चौधरी, सोनाली पाटील, मनीषा चौधरी, उषा राणे, सिमा गजरे, स्वाती नेमाडे, संध्या अट्रावलकर आदींचे सहकार्य लाभले. तसेच या प्रसंगी उद्योजक अरुण बोरोले, किर्तीकुमार बोंडे, पूजा भंगाळे, नीला चौधरी, ज्योती महाजन आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here