Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Purna River In Muktainagar Taluka : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
    जळगाव

    Purna River In Muktainagar Taluka : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 29, 2025Updated:June 29, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    उपाययोजना राबविण्याचे संबंधित विभागांना दिले निर्देश

    साईमत/जळगाव/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :

    मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोल, जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी रविवारी, २९ जून रोजी केली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने पूल परिसरात पूर्व तयारीचा आढावा घेतला. नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढून निर्माण होणाऱ्या संकटावर नियंत्रण ठेवण्यासाठी तात्काळ उपाययोजना राबविण्याचे संबंधित विभागांना निर्देश दिले.

    पाहणी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सिंचन विभाग यांना आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यावेळी भुसावळचे प्रांताधिकारी, तहसीलदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंग रावळ, सिंचन विभागाच्या श्रीमती कुलकर्णी, पूल बांधकामाचे कंत्राटदार श्री. अग्रवाल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

    संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

    पावसाळ्यात पूर्णा नदी काठच्या परिसरात खबरदारी घ्यावी, नदीपात्रात अनावश्यकपणे प्रवेश करू नये आणि प्रशासनाच्या सूचना, इशारे याकडे लक्ष द्यावे, असे नागरिकांसह शेतकऱ्यांना प्रशासनाने आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासन संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी सज्ज आहे. वेळेपूर्वीची पाहणी आणि विभागातील समन्वय हेच प्रभावी आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य आधार असल्याचे संबंधितांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : पिंप्राळ्यात हनुमान जन्मोत्सव रंगला भव्य कथासोहळ्यात

    April 5, 2026

    Pachora : पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई, अवैध गुटखा व दारू जप्त

    April 5, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर हादरले शेतात आढळले नवजात अर्भकाचे प्रेत

    April 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.