Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»Olympic Week : ऑलिम्पिक सप्ताहानिमित्त सीड बॉलची उधळण, १७० वृक्षांचे वृक्षारोपण
    कृषी

    Olympic Week : ऑलिम्पिक सप्ताहानिमित्त सीड बॉलची उधळण, १७० वृक्षांचे वृक्षारोपण

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 27, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत/नाशिक/प्रतिनिधी :

    ऑलिम्पिक क्रीडा सप्ताह अंतर्गत २४ ते ३० जून दरम्यान विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्याप्रमाणे तलवारबाजी, बास्केटबॉल आणि गोल्फ स्पर्धा पार पडल्या. २६ जून रोजी सर्व खेळाडू, क्रीडा संघटक, प्रशिक्षक, आयोजक यांच्या उपस्थितीत नाशकच्या पेठ येथील चामर लेणी येथे बाजी उधळण आणि बीजारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विविध शाळांच्या २१७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला. त्यामध्ये सरस्वती गुलाबराव पाटील शाळा, कोहिनुर इंटरनॅशनल स्कुल, उन्नती विद्यालय आदी शाळांचा समावेश होता. यावेळी आयोजक अशोक दुधारे, अशोक कदम, आनंद खरे, दीपक निकम, सौ. विजया दुधारे, आनंद चकोर, भूषण भटाटे, उत्कर्ष परदेशी, शाळाचे शिक्षक सुनील बिरारी, आरती पुंड, विवेक सोनावणे आदींची उपस्थिती होती. यावेळी १७० झाडे लावण्यात आली तर १५०० सीड बॉल तयार केले होते. उपस्थित विद्यार्थ्यांनी येथे सीड बॉलची उधळण केली.

    विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप

    विद्यार्थ्यांसह त्यांच्या शिक्षकांनी गुरुवारी, २६ जून रोजी सकाळी पावसाची सततधार सुरू असूनही परिश्रम घेऊन उपक्रम चांगल्या प्रमाणात पार पडला. निसर्ग संवर्धनात मोलाचा वाटा उचलला, यासाठी आयोजकांच्यावतीने त्यांचे आभार मानले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. याच उपक्रमाअंतर्गत दोन दिवस नाशिकमध्ये पहिल्या मिनी फुटबॉल फाईव्ह राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती आयोजकांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Jalgaon : फुले कृषी महोत्सव 2026 : केळीच्या ८० वाणांचे थेट प्रात्यक्षिक

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.