Primary Health Center In Neri : नेरीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात किशोरवयीन मुला-मुलींना आरोग्याविषयी मार्गदर्शन

0
12

पीअर एज्युकेटर्स यांना भेट वस्तूंचे वाटप

साईमत/जामनेर/प्रतिनिधी :

तालुक्यातील नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत किशोरवयीन मुला-मुलींना किशोरवयात येणाऱ्या समस्या, वयामध्ये होणारे बदल तसेच सुयोग्य आहाराबाबत सविस्तर मागदर्शन करण्यात आले. तसेच पीअर एज्युकेटर्स यांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.कोमल देसले,राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रमाच्या समन्वयक वैशाली अहिरे उपस्थित होत्या.

याप्रसंगी डॉ.सोनवणे, डॉ.देसले यांनी उपस्थित किशोरवयीन मुला-मुलींना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित आशा स्वयंसेविका यांचे कापूस उत्पादक शेतकरी, शेतमजूर व गरोदर माता यांच्या घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुला-मुलींना भेटवस्तूचे वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी डॉ.कांचन गायकवाड, डॉ.गिरीष पाटील, डॉ.नामदेव पाटील, आरोग्य निरीक्षक सोपान राठोड, आरोग्य सहाय्यिका जयश्री कुलकर्णी, औषध निर्माता पंकज इंगळे, आरोग्य सेवक रवींद्र सूर्यवंशी, संदीप सावकारे, गणेश पाटील, कृष्णा बाबर, गणेश शिंदे, पंकज गणवीर, आरोग्य सेविका रत्नकला उशीर, शीतल रोकडे, शिपाई जितेंद्र नाईक, गटप्रवर्तक निलिमा गवळी, माया बोरसे यांच्यासह सर्व आशा स्वयंसेविका, किशोरवयीन मुले-मुली उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here