Talegaon Attracts Attention : तळेगावला शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेश फेरीने वेधले लक्ष

0
16

जामनेरातील गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रवेशोत्सवाचे उद्घाटन

साईमत/जामनेर/प्रतिनिधी :

तालुक्यातील तळेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाला १६ जून रोजी पुन्हा सुरूवात झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळेचा परिसर गजबजून गेला होता. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी गावात प्रवेश फेरी काढून ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले तर शिक्षकांनी घरोघरी जाऊन पालकांना आपल्या मुलांना शाळेत दाखल करण्याचे आवाहन केले. प्रवेशोत्सवाचे उद्घाटन जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

सकाळी शाळेत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी उत्साहात स्वागत केले. वर्गात प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गावातून एक छोटी जनजागृती फेरी काढली. फेरीत ‘शाळेत चला, ज्ञान मिळवा!’, ‘शिक्षण हेच खरे धन!’ असे घोषवाक्य देत विद्यार्थी गावात फिरले. फेरीत विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

‘शाळा प्रवेश वाढवा’ मोहिमेला मिळाला प्रतिसाद

यावेळी सरपंच आरती कोळी, प्रशांत वाघ, सुनील कोळी, आनंदा भोरे, संजय जाधव, ग्रामसेविका उज्ज्वला महाजन, मुख्याध्यापक अवधूत जाधव, पदवीधर शिक्षक गोपाल पाटील, गजानन नागरे, विनोद पाटील तसेच उपशिक्षक विजय वाघ, फकीरा मेढे, रवींद्र उतारी, कविता इंगळे, किरण धनगर, दीपक पाडोळसे उपस्थित होते. पहिल्याच दिवशी शाळेत नवे विद्यार्थी दाखल झाल्याचे चित्र होते. शाळेच्या प्रवेशोत्सवामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षण विभागाच्या ‘शाळा प्रवेश वाढवा’ मोहिमेला तळेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने उत्तम प्रतिसाद दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here