Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Municipal Elections In Jalgaon : जळगावात मनपाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना सुरुवात
    जळगाव

    Municipal Elections In Jalgaon : जळगावात मनपाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना सुरुवात

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 13, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    निवडणुकीसाठी शिंदे अन्‌ अजित पवार गटाचीही तयारी

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरात महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अद्याप निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी आत्तापासूनच मनपाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली सुरू झाल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. भाजपने शक्य तिथे महायुती आणि ज्या ठिकाणी ताकद आहे तेथे स्वबळाची भाषा वापरली आहे. त्यामुळे राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिंदे आणि अजित पवार गटाने मात्र एकत्र येत वेगळी ‘चूल’ मांडण्याची तयारी केली आहे.

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महायुती सरकारमधील तीनही नेते ठामपणे भूमिका घेताना दिसत नाहीत. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्य तिथे महायुती करून निवडणुका लढवू, असे विधान केल्याने काही ठिकाणी स्वबळाचे संकेत दिले आहेत. तसेच स्थानिक स्तरावरील नेत्यांनीही आपापली ताकद आजमावण्यासंबंधीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. २०१८ च्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्याशी युतीची बोलणी केली होती. मात्र, ऐनवेळी भाजपने स्वबळावर निवडणूक लढविली आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली ५७ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर मात्र मविआच्या सत्ताकाळात भाजपमधील नगरसेवक फुटले आणि महानगरपालिकेत ठाकरे गटाची सत्ता आली होती.

    भाजपाच्या भूमिकेकडे शिंदे, अजित पवार गटाचे लागले लक्ष

    जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. तब्बल २० वर्षांपासून जिल्ह्यात दोन्ही खासदार हे भाजपचेच राहिले आहेत. यंदाही दोन्ही खासदार भाजपचेच आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचे संख्याबळ सारखे आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून एकमेव अनिल भाईदास पाटील हे आमदार झाले आहेत. असे असले तरी ताकद आमचीच, असा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे भाजप मनपा निवडणुकीत काय भूमिका घेईल, याकडे शिंदे आणि अजित पवार गटाचे लक्ष लागले आहे.

    रा.काँ.च्या अजित पवार गटानेही कसली कंबर

    गेल्या निवडणुकीप्रमाणे भाजपने यंदाही स्वबळाचा नारा दिल्यास शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे दोन्ही पक्ष युतीच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप नेत्यांमध्ये चर्चा नसली तरी कार्यकर्त्यांमधून तसा सूर उमटत आहे. कारण जळगाव शहरात शिवसेनेची ताकद राहिली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही मनपा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. जागा वाटपात योग्य स्थान न मिळाल्यास शिवसेना शिंदे आणि अजित पवार गट हे भाजपला टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता आगामी काळात राजकीय हालचाली कशा आणि काय होतील, याकडे जाणकारांचे लक्ष लागून राहणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.