Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Gulabrao Wagh Of Dharangaon : शिवसेना उबाठाच्या उपनेतेपदी धरणगावचे गुलाबराव वाघ
    जळगाव

    Gulabrao Wagh Of Dharangaon : शिवसेना उबाठाच्या उपनेतेपदी धरणगावचे गुलाबराव वाघ

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 5, 2025Updated:June 5, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पक्षाकडून ३८ वर्षाच्या खडतर प्रवासाची मिळाली पावती

    साईमत/जळगाव/धरणगाव/प्रतिनिधी :

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणीसंदर्भात चार उपनेत्यांच्या नियुक्त्यांची नुकतीच घोषणा केली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात चौघांच्या नियुक्त्यांबाबत माहिती दिली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातून धरणगावचे रहिवासी तथा विद्यमान जळगाव जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांचाही समावेश आहे. तसेच त्यांच्यावर उपनेते पदाबरोबरच रावेर लोकसभा आणि नंदुरबार जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. १९८४ मध्ये दहावी पास झाल्यावर त्यांनी धरणगाव येथे कला आणि वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी सेनेची शाखा काढली. त्यांनी विद्यार्थी दशेत असतानाच शिवसेनेत उडी घेतली होती. शिवसैनिक ते शिवसेनेचा उपनेता असा त्यांनी ३८ वर्षे निष्ठेने पक्षाचा खडतर प्रवास केल्याचे फळ अखेर त्यांना मिळाले आहे.

    शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्त्वाला अनुसरून त्यांची निस्वार्थ सेवा सुरू आहे. पक्षाने व संघटनेने त्यांना योग्य ती मानाची पदे दिली असली तरी त्यांच्या कामाची धडाडी, नेतृत्वाचा भर आणि शिवसैनिकांचे पाठबळ अशी त्यांना पावती मिळाल्याने त्यांची उपनेतेपदी पक्षाने नियुक्ती केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना निवड मंडळ, जिल्हा नियोजन मंडळ, संजय निराधार समिती, समन्वय समिती अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.

    रावेरसह नंदुरबार लोकसभा संपर्क प्रमुख पदाचीही राहणार जबाबदारी

    धरणगाव शहराचे आराध्य दैवत श्री बालाजी मंदिर देवस्थानचे श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. व्यायाम प्रसाद मंडळावर संचालक म्हणून ते काम करत आहेत. तसेच गुरुवारी, ५ जून रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते खा.संजय राऊत, संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी संघटनेच्या कठीण काळात शिवसेना उपनेता आणि नंदुरबार जिल्हा व रावेर लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल जिल्ह्यातील उबाठा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.