Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Union Minister of State Raksha Khadse : रावेरला महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांचे थांबे द्यावे : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे
    जळगाव

    Union Minister of State Raksha Khadse : रावेरला महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांचे थांबे द्यावे : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 5, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची रेल्वे बोर्डाच्या चेअरमनांकडे मागणी

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांची नुकतीच भेट घेऊन भुसावळ रेल्वे विभागातील रावेर स्थानकावर काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे देण्याची मागणी केली आहे. बैठकीत रावेर आणि वरणगाव स्थानकांवर स्थानिक नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार गाड्यांचे थांबे देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. श्रीमती खडसे यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांचे थांबे तात्काळ मंजूर करण्याची विनंती केली.

    त्यात नवजीवन एक्स्प्रेस (गाडी क्र. १२६५६)–बोदवड थांबा, दानापूर-पुणे एक्सप्रेस (गाडी क्र. १२१५०)–रावेर थांबा (पुणे मार्ग), महानगरी एक्सप्रेस (गाडी क्र. २२१७७)–रावेर थांबा ह्या गाड्यांचा समावेश आहे. रावेर येथे गाड्यांचे थांबे देण्यात आल्यास शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार, कामगार वर्ग तसेच सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे संपूर्ण परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास साधला जाईल, असा विश्वास श्रीमती खडसे यांनी व्यक्त केला.

    मागण्यांकडे सकारात्मकपणे लक्ष देणार

    रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांनी त्यांच्या मागण्यांकडे सकारात्मकपणे लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. बैठकीला रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.