Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»Farmers In Karanwadi Got Rohit करणवाडीतील शेतकऱ्यांना शिवसेना उबाठाच्या आंदोलनाच्या धास्तीने बदलवून मिळाले रोहित्र
    कृषी

    Farmers In Karanwadi Got Rohit करणवाडीतील शेतकऱ्यांना शिवसेना उबाठाच्या आंदोलनाच्या धास्तीने बदलवून मिळाले रोहित्र

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 2, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांनी मानले आभार

    साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :

    शेतकऱ्यांच्या शेतात विहिरीत पाणी उपलब्ध असतांना डीपी अर्थात रोहित्रावरील ट्रान्सफॉर्मर ६३ केव्हीचा असल्याने दाब म्हणजेच लोड कमी-जास्त होऊन वारंवार वीज पुरवठा झाल्याने जळगाव जामोद तालुक्यातील करणवाडीतील तायडे डीपी परिसरातील शेतातील उभी पिके डोळ्यासमोर सुकून जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी यासंदर्भात शिवसेना उबाठाचे शहरप्रमुख गजानन ठोसर यांना माहिती दिली होती. शिवसेना उबाठाने दिलेल्या आंदोलन इशाऱ्याच्या धास्तीने शेतकऱ्यांना डीपी बदलवून मिळाली आहे. याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

    तायडे डीपीवरील सर्व शेतकऱ्यांना घेवून शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर, उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, कामगार सेना शहरप्रमुख हरीदास गणबास, किसान सेना शहरप्रमुख सै.वसीम, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता राजेश मिश्रा, आर.जी.तायडे यांना आठ दिवसात ६३ चा ट्रान्सफॉर्मर बदलवून १०० केव्हीचा ट्रान्सफार्मर न दिल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा दिला होता.

    डीपीवर १०० केव्हीचा ट्रान्सफार्मर बसविला

    शिवसेनेच्या आंदोलनाच्या धास्तीने शनिवारी, ३१ मे रोजी पिंपळगाव सबस्टेशन अंतर्गत करणवाडी येथील तायडे डीपीवर १०० केव्हीचा ट्रान्सफार्मर बसविण्यात आला. डीपीवरील प्रमोद वाघमारे, रमेश बोदडे, सुनील ससाने, वामन तितुर, अवी खिरोडकर, रमेश तितुर, अंबादास देवगुंदे, पुंडलिक धनके, परमेश्वर वाघमारे, समाधान वाघमारे, रामकृष्ण तितुर, सुनील तायडे, रामकृष्ण झाल्टे, शिवा खिरोडकर, पांडुरंग खिरोडकर, शिवा घुळे, ज्योतीराम देवगुंडे, गजानन खिरोडकर, नामदेव खिरोडकर, गणेश कवळे,महादेव कोथदकर, शिवा पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Malkapur:मलकापूरला धक्का व्यवसायिक ऑटोचालकाचा रस्त्यावर निर्घृण खून

    January 8, 2026

    Malkapur:पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमधील कामकाजाचे मार्गदर्शन

    January 7, 2026

    Malkapur:सावित्रीबाई फुले यांचे विचार कृतीत उतरवा : प्रा.शारदा खर्चे

    January 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.