Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»MNS Demands : यावलला पाणी पुरवठा सुरळीत करा अन्‌ आठवडे बाजारालगतचे अतिक्रमण काढा : मनसेची मागणी
    यावल

    MNS Demands : यावलला पाणी पुरवठा सुरळीत करा अन्‌ आठवडे बाजारालगतचे अतिक्रमण काढा : मनसेची मागणी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 1, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मनसेने मुख्याधिकाऱ्यांना दिले प्रमुख मागण्यांचे निवेदन

    साईमत/यावल/प्रतिनिधी :

    शहरात सुरळीत, मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी तसेच आठवडे बाजारालगत असणारे अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी यावल नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे मनसेचे तालुका पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतांना शहरातील नागरिकांसह शहराध्यक्ष गौरव कोळी, तालुकाध्यक्ष किशोर नन्नवरे, उपतालुकाध्यक्ष शाम पवार, जनहित विधी विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन दिलीप अढळकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

    निवेदनात नमूद केले आहे की, यावल शहरात गेल्या आठ दिवसांपासून पाणी पुरवठा झालेला नाही. यावल शहरात पाणीपुरवठा सुरळीत करावा.पाणी पुरवठा संदर्भात ज्या काही समस्या असतील त्या तात्काळ आपल्या स्तरावर मार्गी लावाव्या, पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडे लागलेले कामगारांचा पगार वेळेवर होत नसल्यामुळे त्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यांचे जे काही महिन्यांचे पगार थकीत बाकी असतील, ते तात्काळ देणी करावी, यावलकरांचा पाणी पुरवठा हा सुरळीत करावा. तसेच यावल शहरातील आठवडे बाजार हा अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर भरला जातो. त्याठिकाणी मोठे अवजड वाहन हे ये-जा करत असतात. त्यांना जाण्यासाठी खुप कसरत करावी लागते. महिला मोठ्या प्रमाणात बाजार करण्यासाठी येतात. भविष्यात अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

    आठवडे बाजार हा नेहमीप्रमाणे नगरपरिषदेच्या आतल्या जागेत भरत आहे.आठवडे बाजारालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण काढल्यास रस्त्यावरील बाजार हा तिथे बसण्यास जागा मोकळी होऊ शकते. अतिक्रमण काढण्यासाठी न्यायालयाने तसा निकालही दिला आहे. यासंदर्भात अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यावल शहरात महिलांसाठी प्रसाधन गृह, शौचालय अस्तित्वात नाही. बाजारात येणाऱ्या महिलांसह नागरिकांसाठी ही सुविधा नगरपरिषदेमार्फत उपलब्ध करून देण्यात यावी.

    आंदाेलनाचा दिला इशारा

    सर्व समस्यांचे लवकरात लवकर निवारण करण्यात यावे, अशीही मागणी निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा तसे न झाल्यास महाराष्ट्र निवनिर्माण सेनेतर्फे नागरिकांसह महिलांना सोबत घेवून आंदोलन करण्यात येईल, त्याची सर्वस्वी जबाबदारी नगर प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    yaval : भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक बसमध्ये सोन्याची पोत चोरी

    January 23, 2026

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.