Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»players felicitated : शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार
    जळगाव

    players felicitated : शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार

    Vikas PatilBy Vikas PatilMay 5, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार

    जळगाव (प्रतिनिधी)-

    जिल्ह्यात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी जळगावमध्ये २५० कोटी रुपये खर्चाचे विभागीय क्रीडा संकुल उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळावे यासाठी १४ लाख रुपये निधीतून क्रीडांगणांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

    महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संघटन महासंघ आणि शारीरिक शिक्षण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात ४ मेरोजी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा गौरव सोहळा पार पडला.

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्याने काही वर्षांत क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून, राज्यस्तरीय सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंची वाढती संख्या याचाच पुरावा आहे. यंदा जिल्ह्यातील पाच खेळाडूंना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी जिल्ह्याचा अभिमान व्यक्त केला. आमदारांनी केलेल्या मागणीनुसार जिल्ह्यातील क्रीडा संकुलांची कामे मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

    या कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांची उपस्थिती होती.

    आमदार राजूमामा भोळे यांनी जिल्ह्यातील वाढत्या क्रीडा संस्कृतीबद्दल समाधान व्यक्त करत पुरस्कारप्राप्त खेळाडूंचे अभिनंदन केले.

    सॉफ्टबॉल खेळातील जयेश मोरे, कुमारी नेहा देशमुख, प्रीतिश पाटील, कॅरम खेळातील अभिजित त्रिपणकर, संदीप दिवे, योगेश ढोंगळे, बेसबॉल खेळातील कुमारी रेखा धनगर आणि योग क्षेत्रातील डॉ. शरयू विसपूते (ज्यांनी एशियन योग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे) यांचा सन्मान करण्यात आला.

    क्रीडा शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या २८ पीएच.डी. धारक प्राध्यापक व शिक्षकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला युवा पुरस्कारप्राप्त सन्मानार्थी जिनल जैन, मोनाली कुमावत, गोपाल दर्जी, तेजस पाटील, नरेद्र पाटील, अनिल बाविस्कर, शुभागी फासे, अविनाश जावळे, सागर कोळी आणि विलास नारखेडे यांचा देखील गौरव करण्यात आला.

    या सोहळ्याला जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, माजी महापौर ललित कोल्हे, क्रीडा महासंघाचे उपाध्यक्ष नारायण खडके, श्याम कोगटा, जनता बँकेचे चेअरमन सतीश मदाने, माजी कुलसचिव संभाजी देसाई, प्रदीप तळवळकर, एजाज मलिक, सरिता कोल्हे, अजय देशमुख, ऍड. रोहन बाहेती, योगेश मांडे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सॉफ्ट बॉल संघटनेचे प्रदीप तळवेलकर यांनी केले प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयंत जाधव, अरुण श्रीखंडे, विनोद माने, विनोद कुलकर्णी आणि अविनाश महाजन यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    एरंडोलचा सुपुत्र देशात चमकला! UPSC मध्ये आकाश त्रिवेदी देशात ७३ वा

    March 6, 2026

    Jalgaon : महापौरांच्या आदेशानंतर महानगरपालिकेची धडक कारवाई; जैन मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त

    March 6, 2026

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.