Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»एरंडोल»Youth commits suicide : कमी गुण मिळाल्याने पाचोऱ्यात तरुणाची आत्महत्या
    एरंडोल

    Youth commits suicide : कमी गुण मिळाल्याने पाचोऱ्यात तरुणाची आत्महत्या

    Vikas PatilBy Vikas PatilMay 5, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कमी गुण मिळाल्याने पाचोऱ्यात तरुणाची आत्महत्या

    पाचोरा (प्रतिनिधी)-

    आज बारावीच्या निकालात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने नैराश्यातून १९ वर्षीय तरुणाने पाचोऱ्यातील बहिणीच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

    भावेश प्रकाश महाजन (वय – १९ वर्ष, रा. एरंडोल) हा विद्यार्थी एरंडोल येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. १२ वीची भावेश याने एरंडोल येथे परीक्षा दिली होती. परीक्षा दिल्यानंतर भावेश १५ दिवसांपासून पाचोरा येथील भडगाव रोडवरील राजीव गांधी कॉलनीत (शक्तीधाम जवळ) राहत असलेल्या बहिणीकडे आला होता. ४ मेरोजी सायंकाळी भावेशची बहिण व पाहुणे पुणे येथे लग्न समारंभासाठी गेले होते. भावेश ५ मेरोजी सकाळी १० वाजता पाचोरा शहरातील रेल्वेस्थानक रोडवरील दुसऱ्या पाहुण्यांच्या दुकानावर गेला होता. दुपारी भावेश दुकान बंद करुन राजीव गांधी काॅलनी येथील बहिणीच्या घरी गेला. दुपारी १२ वीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला. यात भावेश यास ४२ टक्के गुण मिळाले. भावेशने नैराश्यातून बहिणीच्या राहत्या घरात गळफास घेत जीवनयात्रा संपवली.

    दुसरीकडे शहरातच वास्तव्यास असलेल्या दुसऱ्या बहिणीकडून भावेश यास जेवणाचा डब्बा येत होता. डब्ब्यासाठी बहिण भावेश यास फोन करीत होती. मात्र भावेश फोन उचलत नव्हता. अखेर पाहुण्यांनी शेजारी मित्राला घरी जाऊन चौकशी करण्यास सांगितले त्यावेळी ही घटना समोर आली.

    पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह रुग्णवाहिका चालक संजय पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.

     

     

     

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.