subsidy for tractors : शेतकऱ्यांना टॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळणार

0
22

शेतकऱ्यांना टॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळणार

मुंबईः (प्रतिनिधी)-

केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी यांत्रिकीकरण योजनेला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना टॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. त्यात केंद्राचा ६० टक्के आणि राज्याचा ४० टक्के हिस्सा असणार आहे.

या योजनेसाठी केंद्र सरकार १२२.४८ कोटी रुपये आणि राज्य सरकार ८१.६५ कोटी रुपये खर्च करणार आहे. ‌‘महाडीबीटी पोर्टल‌’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट अनुदान मिळणार आहे. अनुसूचित जाती, जमाती, महिला शेतकरी, अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

अनुसूचित जाती, जमाती आणि महिला शेतकऱ्यांना टॅक्टरच्या किंमतीच्या ५० टक्के किंवा १.२५ लाख रुपये अनुदान मिळणार आहे. सामान्य शेतकऱ्यांना ४० टक्के किंवा १ लाख रुपये अनुदान मिळेल. अर्ज करण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना ‌‘महाडीबीटी पोर्टल‌’वर कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here