Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»copyrights : रायसोनी महाविद्यालयाने एकाच दिवशी नोंदविले २५१ कॉपीराईट 
    जळगाव

    copyrights : रायसोनी महाविद्यालयाने एकाच दिवशी नोंदविले २५१ कॉपीराईट 

    Vikas PatilBy Vikas PatilApril 28, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रायसोनी महाविद्यालयाने एकाच दिवशी नोंदविले २५१ कॉपीराईट 

    जळगाव (प्रतिनिधी)-

    शहरातील स्वायत्त जी. एच. रायसोनी इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात जागतिक बौद्धिक संपदा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी २५१ कॉपीराईट विद्यार्थी व प्राध्यापकांनी दाखल करत नवीन विक्रम नोंदविला. चार वर्षापासून असे विक्रम करणारे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय म्हणून लौकिक असलेल्या जी. एच. रायसोनी महाविद्यालयाने २०२२ ला १५४ , २०२३ ला १०८, २०२४ ला १९४ कॉपीराईट व १८ पेटंट व यावर्षी बौद्धिक संपदा दिनाच्या औचित्याने २५१ कॉपीराईट नोंदवले .

    इस्टीट्युटच्या इंडस्ट्री प्रॅक्टीसेस, अॅकडमिक, शैक्षणिक साहित्य तसेच इंडस्ट्रीमध्ये कुठकुठल्या बेस्ट प्रॅक्टीसेस आहेत यासह स्टुडंट्स प्रोजेक्टवरील पोस्टर, लॅब मॅन्युअल, कोर्स नोट्स, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, मोनोग्राफ आदी बाबींवर हे कॉपीराइट दाखल करण्यात आले आहेत.

    हा उपक्रम इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स सेल व रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे एक्झामिनर ऑफ पेटंट्स अँड डिझायनर यासिर अब्बास झैदी उपस्थित होते. प्रास्ताविक संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले

    नंतर प्रमुख वक्ते यासिर अब्बास झैदी यांनी सांगितले की, बौद्धिक संपदा निर्माण करणं आणि ती राखणं, इतरांच्या बौद्धिक संपदेचं कायद्यानुसार जे मूल्यमापन झालेलं असेल, त्यानुसार तिचा मान राखणं, हाच आजच्या ‘जागतिक बौद्धिक संपदा दिना’चा उद्देश आहे बौद्धिक संपदेचे सरंक्षण अतिशय महत्त्वाची बाब असून, व्यक्तीच्या मृत्यूनंतर ६० वर्षांपर्यंत व्यक्तीच्या कुटुंबियांना रॉयल्टी मिळण्याची तरतूद भारतीय कायद्यात असल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञान आणि तंत्रज्ञानातील कल्पक संशोधनांनी मानवी जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणले आहेत. संशोधकाच्या सर्जनशील कल्पकतेचा संशोधनाच्या वापरावरील हक्क आता सर्वमान्य आहे. संशोधनाला साधनसामुग्रीची वाण भासू नये, समाजातील संशोधकीय गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे, या दृष्टीने पेटंट कायद्यांच्या स्वरूपात नियंत्रणव्यवस्था जगभर अस्तित्वात आहे. भारतही त्याला अपवाद नाही असे मत त्यांनी नोंदविले

    या कार्यशाळेसाठी अॅकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख व रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलचे डीन प्रा. डॉ. मुकुंद पाटील, प्रा. डॉ. निलेश इंगळे यांनी समन्वय साधला सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा सराफ यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Raver:नवजात बाळ मृत्यू प्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला सेवेतून कमी

    March 12, 2026

    Jalgaon: जळगाव भांडी संच वाटप केंद्रावर ‘केवायसी’ फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

    March 12, 2026

    Jalgaon: जळगाव हॉटेल उद्योगावर गॅस तुटवड्याचा संकट

    March 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.